राज्यात १५ दिवस संचारबंदी जाहीर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
उद्या रात्री 8 पासून संचारबंदी लागू
मुंबई, (प्रतिनिधी)- राज्यातील कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आल्याची सांगत उद्या संध्याकाळी ८ वाजेपासून लागू होणार असल्याचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं
राज्यात आज दिवसभरात ६०२१२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा असल्याचा मुख्यमंत्री यांनी जनतेशी संवाद साधतांना सांगितलं तर ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढवली आहे. राज्यात १२०० मॅट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन आहे त्यापैकी ९०० मॅट्रिक टन ऑक्सिज रुग्णांसाठी वापर होतं आहे. मात्र तरीही ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. आता रेमडिसिवर इंजेक्शन पुरवठा होतं असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं आहे
ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पंतप्रधानकडे मागणी करणार
राज्यात ऑक्सिजन पुरवठा कमी असल्यानं इतर राज्यातून पुरवठा करणेबाबत व ऑक्सिजन ची हवाई मार्गाने वाहतुकीची परवानगी द्यावी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करणार असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं आहे.
लसीकरणाच्या राजकारणात मला पडायचं नसून कोरोनाची दुसरी लाट रोखण्याठी लसीकरण महत्वाचं आहे, राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण वाढविण्यात आले आहे. आरोग्य विषयक लागणाऱ्या सर्व सुविधा वाढविण्यावर भर देत आहोत असंही मुख्यमंत्री म्हणाले.
हे असतील निर्बंध…
1)राज्यात पुढील १५ दिवस १४४ कलम लागू
३)अनावश्यक घरा बाहेर पडता येणारं नाही,कारण नसताना बाहेर पडल्यास होणार कारवाई
३)सकाळी ७ ते रात्री ८अत्यावशक सेवा सुरु राहतील
४) यापुढे बस, लोकल, पब्लिक ट्रान्सपोर्ट(सर्वजणनिक वाहतूक सेवा ) हे बंद न करता फक्त अत्यावशक सेवा देणाऱ्यांना प्रवास करता येईल.
(सविस्तर वृत्त लवकरच…)