जांबसमर्थ परीसरात रानडुकरांचा हैदोस शेतकऱ्यांच्या जीवावर
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ परीसरात रानडुकरांचा हैदोसाने पीक जमीनदोस्त करून शेतकऱ्यांवर हल्ला चढवित आहे.यामुळे धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.वनविभाग सुस्त असल्याने कार्यवाही होताना दिसत नाही.दरम्यान महावितरण शेतकऱ्यांना रात्रीची विज देत असल्याने शेतकऱ्यांना आपला जीव मेटाकुटीला धरून शेतात जावे लागते.हातात कंदिल,टार्च,हातात घेवुन मार्ग काढावा लागत आहे.विरेगव्हाण शिवारात पैठण डाव्या कालव्या जवळ नाल्याकाठ्यावरील झाडी झुडुपात रानटी डुकरे दिवसाला लपून निवांत राहतात.शेतातील ऊसाच्या शेतात सुद्धा आश्रयीत राहून रात्रीला बेधुंद होत धान पिकावर तुटून पडतात.खाणे कमी व नुकसान जास्त होत असल्याने शेतकरी धास्तावला आहे.वनविभागाकडून नुकसान भरपाई २५ टक्के सुद्धा होत नाही.रानडुकरांच्या हैदोसाने मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.