घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
विरेगव्हाण तांडा येथे शेतात उभी केलेली दुचाकी लंपास
कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी कुलदीप पवार
विरेगव्हाण तांडा येथे गट क्र.36 मध्ये रस्त्यालगतच्या शेतात उभी केलेली सीबी शाईन कंपनीची दुचाकी क्र.एम.एच.21बीए 1895 चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना दि.9 जून रोजी सायंकाळी सहावाजेच्या दरम्यान घडली आहे.याप्रकरणी महादेव नानासाहेब निचळ यांच्या फिर्यादीवरून घनसावंगी पोलीस ठाण्यात संशयित अज्ञात व्यक्तिविरूद्धात गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलिस करीत आहे.