जालना जिल्हा
प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत हस्तांतरित करू नये : ग्रामस्थांची मागणी
कुंभार पिंपळगाव:
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी गट क्र. 447 मध्ये 80 आर. जमीन असून नवीन इमारतीचे काम फक्त 20 आर. जमिनीमध्ये करण्यात आलेले आहे व प्राथमिक आरोग्य केंद्राची 60 आर. जमीन जि.प. आरोग्य विभाग व जि.प. बांधकाम विभागाचे अधिकारी व इतर काही लोकांनी संगणमत करून बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे व प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत फक्त 20 आर. मध्ये केल्यामुळे अनेक असुविधा किंवा अडचणी निर्माण झालेल्या आहेत व याप्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी चालू आहे.
करीता ग्रामपंचायतने ही इमारत हस्तांतरीत करून घेवू नये अशी मागणी रमेश तौर ,
अशोक राजेजाधव , अण्णासाहेब कंटूले,बाळराजे आर्दड,तुळशीराम कंटूले यांनी ग्रामपंचायत कडे केली आहे.