फोरेट कीटकनाशक विक्री केल्याने उत्पादक कंपणी व कृषि सेवा केद्रांवर कृषि विभागाकडुन गुन्हा दाखल
भोकरदन तालुक्यातील पारध व सेलुद या ठिकाणी काहीकेद्रांवर कृषि विभागाकडुन गुन्हा दाखल
जालना दि. 4 :- केंद्र शासनाने फोरेट 10-G या किटकनाशक उत्पादनावर व विक्रीवर दि. 31 डिसेंबर 2020 पासुन बंदी घातली आहे. भोकरदन तालुक्यातील पारध व सेलुद या ठिकाणी काही कृषि केंद्रामधुन बंदी असलेल्या फोरेट 10-G ची विक्री होत असल्याची माहिती जिल्हा स्तरीय गुणनियंत्रण पथकास मिळाली. त्यानुसार 27 जुलै 2021 रोजी जिल्हास्तरीय गुणनियंत्रण पथक प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी भिमराव रणदिवे विभागीय कृषि सहसंचालक औरंगाबाद कार्यालयाचे तंत्र अधिकारी श्री. प्रशांत पवार , मोहिम अधीकारी सुधाकर कराड, भोकरदन पं.स. च्या कृषि अधिकारी सौ. रेजा बोडके यांनी प्रत्यक्ष कृषि सेवा केद्रांना भेटी देउन तपासणी केली असता अल्फा ॲग्रो सायंन्स प्रा.ली. अधेरी मुंबई या उत्पादक कंपणीचे 273 किलो फोरेट 10-G पुनम कृषि सेवा केंद्र सेलुद ता. भोकरदन आणी ग्लोबल क्रॉप सायंन्स कंपणी फॅन्टोम 10 टक्के सी. जी. 191 किलो न्यु. अक्षय कृषि सेवा केंद्र पारध ता. भोकरदन जि. जालना येथे आढळुन आले.
पंचायत समिती कृषि अधिकारी सौ. रेजा बोडके यांनी सदर किटकनाशकाचे नमुने घेउन शासकीय प्रयोग शाळा औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविले असुन या साठयास विक्री बंद आदेश दिलेले आहे. सदर दोन्ही उत्पादक कंपणी व कृषि सेवा केंद्रावर यांचे वर किटक नाशके कायदया अंतर्गत पारध पोलीस स्टेशन ता. भोकरदन येथे सौ. रेजा बोडके यांनी दि. 3 ऑगस्ट 2021 रोजी गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास सुरु आहे.