कैकाडी समाजाला यशवंतराव घरकुल योजनेचा लाभ द्या
घनसावंगी
घनसावंगी तालुक्यातील कैकाडी समाजाला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजने अंतर्गत लाभ तसेच क्षेत्रिय बंधन उठवून एससी प्रवर्गाच्या सवलती देण्याची मागणी अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या वतीने तहसीलदार योगिता खटावकर यांना निवेदनातून करण्यात आली आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजने अंतर्गत जालना जिल्ह्यात सुमारे ५ हजार ५१० घरकुल मंजुर करण्यात आले आहेत. मात्र सदर योजने अंतर्गत, भटक्या विमुक्त समाजातील बंजारा, वंजारी, धनगर या समाजास जास्त प्राधान्य देण्यात आलेले आहे. याऊलट याच कॅटेगरीतील अतिशय उपेक्षीत, वंचीत, दुर्लक्षीत असलेल्या कैकाडी समाजाला यामध्ये विशेष असे स्थान देण्यात आलेले नाही. तसेच कैकाडी समाजावरील लादलेले क्षेत्रीय बंधन उठवुन पुर्ण कैकाडी समाजाला एससीं प्रवर्गाच्या सवलती देण्यात याव्यात
घनसावंगी तालुक्यातील प्रत्येक खेड्यागावातुन कैकाडी समाजातील किमान चार लाभार्थ्यांचा सदरील योजनेत समावेश करुन घरकुलाचा लाभ द्यावा, मागणी मान्य न झाल्यास अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या वतीने संपुर्ण जिल्हाभरात तसेच घनसावंगी मध्ये उग्र आंदोलन छेडण्यात येईल. असा ईशारा आज दिनांक २८ सप्टेंबर शनिवारी दुपारी दोन वाजता दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. आणी याची संपूर्ण जबाबदारी शासनावर असेल असेही म्हंटले आहे.
निवेदनावर संघटनेचे मराठवाडा युवा कार्याध्यक्ष तुळशीराम निवृत्ती जाधव, सनि कैलास पवार,सुभाष मामा जाधव,अक्षय बोरसे,कार्तिक जाधव,अजय जाधव,ज्ञानेश्वर कैलास पवार,कृष्णा भिमराव जाधव,अक्षय उत्तम जाधव यांच्या स्वाक्षरी आहेत.