मंठा तालुका

परतूर मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे नितीन गडकरी यांचे आश्वासन

मंठा/ रमेश देशपांडे

images (60)
images (60)

परतूर विधानसभा मतदारसंघातील वाटूर -जयपूर- बेलोरा- जांभोरा ते राहेरी त्याचबरोबर परतुर ते सातोना-मानवत रोड तसेच हट्टा-तळणी- गारटेकी- चौफुली ते सेवली- नेर – चितळी फाटा या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे मजबुती करण करण्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून या मागणीला प्रतिसाद देत नितीन गडकरी यांनी या मागण्या संदर्भात सकारात्मक चर्चा करून या रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असल्याचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी सांगितले आहे


केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी भेट घेऊन मतदार संघातील विविध रस्त्यांच्या संदर्भामध्ये चर्चा करून माजी मंत्री बबनराव यांनी परतूर विधानसभा मतदारसंघातील केलेल्या मागण्यांचे निवेदन नितीनजी गडकरी यांना दिले
यावेळी ना नितीनजी गडकरी यांनी प्रत्येक मागणी समजून घेत या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!