शिवसेना नेते आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत, ना. अंबादास दानवे बुधवारी मंठा तालुक्याच्या दौऱ्यावर……
मंठा/ प्रतिनिधी :
परतुर मंठा विधानसभा मतदारसंघांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत आणि राज्याची विरोधी पक्षनेते ना. अंबादास दानवे बुधवार ता.4 रोजी मंठा तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
या दौऱ्यात त्यांच्यासोबत खासदार संजय जाधव, आमदार राजेश राठोड, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा बाजार समितीचे सभापती ए.जे.बोराडे, उपसभापती गोपाळराव बोराडे,ॲड. पंकज बोराडे उपस्थित राहणार असून मंठा, पांगरी खुर्द यासह काही गावांना भेटी देऊन नुकसान झालेल्या शेतीपिकांची पाहणी करणार आहे.
यावेळी ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख अजय अवचार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निळकंठ वायाळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव गणगे यांनी केले आहे.