घनसावंगी तालुका
एस.एम.एस. अकॅडमीत रक्षाबंधन उत्साहात साजरा
कुंभार पिंपळगाव :कुलदीप पवार
आज एस.एम.एस.अकॅडमी मध्ये रक्षाबंधन साजरा करण्यात आले.यावेळी वर्गातील मुलींनी मुलांना राखी बांधून त्यांचे औक्षण केले. सर्व विद्यार्थ्यांना आजच्या दिवसाचे महत्व सांगून बहीण-भावाच्या नात्यावर विशेष प्रकाश टाकला.भावाने बहिणीची सुरक्षा करावी व बहिणीने भावाला नेहमी चांगल्या मार्गावर राहण्यासाठी मार्गदर्शन करावे असा संदेश यावेळी मुलांना सांगण्यात आला.
या प्रसंगी अकॅडमी चे संचालक राम राऊत,किशोर मोरे,विक्रम राऊत आदी. होते