महाराष्ट्र न्यूज
ब्रेकिंग! केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी केली अखेर अटक
रत्नागिरी / प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे.
यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना हटवलं आणि ते राणेंना घेऊन नाशिककडे निघाले.
त्यांना नाशिक पोलिसांकडे सुपुर्द करण्यात येणार असून त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कोर्ट काय निर्णय देते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान अटकेपूर्वी रत्नागिरी सत्र न्यायालयाने नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र हा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.