काँग्रेसचे राजेश राठोड यांच्या याच्या नावाला पक्षाकडून हिरवा कंदील

Get real time updates directly on you device, subscribe now.


परतूर /दिपक हिवाळे
जालना जिल्ह्यातील सतत चर्चेत असलेले परतूर मंठा विधान सभा मतदार संघ आणि याच मतदारसंघातील काँग्रेसचे युवा नेते तथा जालना जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती राजेश राठोड यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी मुकुल वासनिक यांनी होणाऱ्या विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे या मे महीन्या आखेर एकूण ०९ विधान परिषद सदस्याची मुद्दत संपत असून त्यासाठी तिनही म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना या महा विकास आघाडीतील उमेदवारांना आपआपल्या पक्षातर्फ उमेदवारी जाहीरृ झाली जिल्ह्यातील काँग्रेसचे युवा नेते राजेश राठोड यांना उमेदवारी जाहीर करून काँग्रेस पक्षाने त्यांच्या सेवेची जणू पावतीच दिली आहे.

जेथलिया समर्थकांचे स्वप्न पुन्हा भंगले-
याच जागेसाठी माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी सुध्दा पक्ष श्रेष्ठीकडे फिल्डींग लावलेली होती असे कळते. आणि सुरेश कुमार जेथलिया यांचे समर्थक कार्यकर्त्यांना सुद्धा वाटत होते की जेथलिया हे गत विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने त्यांचे यावेळेस तरी विधान परिषदेत पुर्नवसन होउन आमदारकी मिळेल. तसेच त्यांचा काँग्रेस पक्षात खूप मोठा दबदबा आहे आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे खंदे समर्थक आहेत परंतु राजेश राठोड यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर जेथलिया समर्थ कार्यकर्त्यांचे स्वप्न धुळीस मिळालेले पाहावयास मिळत आहे. आपली संपूर्ण ताकद पणाला लावली परंतु त्यात त्यांना अपयश आले.

राजेश राठोड यांचा अल्पपरिचय
माजी आमदार प्राचार्य धोंडीरामजी राठोड यांचे चिरंजीव काँग्रेस पक्षात राठोड परिवाराने केलेली एक निष्ठा, पक्षाची सेवा देशात मोदींची लाट आसतांना ,काँग्रेस पक्षाला घरघर लागलेली असताना देखील राठोड पिता पुत्रांनी समर्थ काँग्रेसच्या पाठीशी उभे राहून परतूर मंठा मतदार संघात पक्ष मजबूत करण्यासाठी सतत परिश्रम केले व काँग्रेस पक्षाला परतुर विधानसभा मतदारसंघात उभारी देण्याचे काम केले आणि मतदारसंघात कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली . सोबतच शैक्षणिक संस्थाचे जाळे मतदारसंघात विणून कार्यकर्त्यांची फौज उभी केली. पक्षाने राजेश राठोड परिवाराच्या कार्याची दखल घेऊन त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन काँग्रेस हा तळागळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारा पक्ष असल्याचे सिद्ध केले. मागील एक दशकापासून प्राचार्य धोंडीराम राठोड यांचा लोक संपर्क कार्यकर्त्यांची फळी पक्षाची एक निष्ठा या परिवाराची खरी ओळख गत विधानसभा निवडणुकीत यांना काँग्रेस पक्षा तर्फ उमेदवारी जाहीर होता होता जेथलिया यांच्याकडे गेली आणि यांची विधानसभा हुकली. तरीही न डगमगता राठोड यांनी पक्षाची साथ सोडली नाही. काँग्रेस पक्षाने या अगोदर राजेश राठोड यांचे वडील धोंडीरामजी राठोड यांना विधान परिषदेवर नियुक्त करून त्यांच्या कार्याची दखल घेतली परंतु त्यांचे पुत्र राजेश राठोड यांचा अनेक वेळा अपेक्षा भंग झाला .तो सहन करून पक्षाला मजबूत करण्यासाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता इमाने इतबारे राजेश राठोड यांनी काँग्रेसचे कार्य सतत सुरू ठेवले याची दखल घेत काँग्रेसने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांच्या कार्याची जणू काही पावतीच दिली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

20% CASHBACK OFFER new 20% CASHBACK OFFER new