घनसावंगी तालुकाजालना क्राईम

पाडोळी येथे भरदिवसा घरात घुसून दोन ठिकाणी चोरी ; पोलीसांना चोरट्याचे खुले आवाहन

images (60)
images (60)

जालना ;
घनसावंगी तालुक्यातील पाडूळी खुर्द व मच्छिद्रनाथ चिंचोली येथे भरदिवसा घरात घुसून चाकूचा धाक दाखवून चोरी केल्याची घटना घडली आहे या दोन्ही घटनेत तीन लाख अंशी हजार रुपये लंपास करण्यात आले आहे

पाडूळी येथे दिवशा ढवळ्या घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून 31 हजार रुपये चोरी केल्याची घटना बुधवारी दुपारी अडीच वाजता घडली आहे
पाडूळी येथील संभाजी नाईक यांच्या घरात पत्नी एकटीच आराम करत असताना अचानक दोन चोरट्याने टाबीने दराचा कोंडा तोडून हातात चाकू दाखवुन पैसे मागितले परंतु चोरटे दुसऱ्या खोलीत प्रवेश करत असताना वैष्णवी संभाजी
नाईक ह्या घराबाहेर पळाल्या गादीखाली असलेल्या 31 हजार रोख रक्कम चोरट्यानी लंपास केली
घटनेची माहिती मिळताच सह्ययक पोलीस निरीक्षक खरात घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली
दरम्यान घनसावंगी मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील परमेश्वर शिवाजी तेलंग हे पत्नीसह शेतात कामाला गेले असता, त्यांच्या घरी चोरट्यांनी कुलूप तोडून चोरी केली.

यामध्ये कपाटातील पन्नास हजार रुपये रोख व तीन तोळे सोने असे एकूण साडेतीन लाख रुपये लांबविले. ही घटना बुधवारी (ता.२१) दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली. सायंकाळी परमेश्वर तेलंग व त्यांचे कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी परमेश्वर शिवाजी तेलंग यांनी घनसावंगी ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!