तीर्थक्षेत्र जांबसमर्थ येथे भव्य सत्संग व जनकल्याण मेळावा संपन्न
कुंंभारपिंपळगाव :तीर्थक्षेत्र जांबसमर्थ येथे आयोजित संत्संग व जनकल्याण मेळाव्यात मार्गदर्शन करताना गुरूमाउलींचे सुपुत्र चंद्रकांत दादा मोरे व समोर उपस्थित जनसमुदाय.
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील तीर्थक्षेत्र जांबसमर्थ येथील संत रामदास स्वामी यांच्या मंदिरात भव्य सत्संग व जनकल्याण मेळावा आज (दि.९) मंगळवार रोजी गुरुमाऊली यांचे परमश्रद्धेय तथा सुपुत्र चंद्रकांत दादा मोरे यांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या मेळाव्यात पुढे बोलताना म्हणाले की,जिथे भक्तांचे काम असमर्थ आहेत.तिथे संत रामदास स्वामी समर्थ उभे आहेत.रामदास स्वामींनी संत संगती घडवून चांगल्या लोकांची जनसेवा माझ्या हातून घडावी अशी प्रभु रामाला विनवणी केली.रामदास स्वामी हे आज गुरूमाऊलींच्या देहबोलीतून कार्यान्वित झाले आहे.दिंडोरी प्रणित महाराष्ट्रात सात हजार अध्यात्मिक केंद्र उभे आहेत. विनामूल्य दु:खातून मुक्त उपचार करणे यालाच अध्यात्मिक केंद्र म्हणत असल्याचे चंद्रकांत दादा मोरे यांनी सांगितले.निरव्यसनी तरुणांना सेवेकरी म्हणून संबोधले जातात.देवाचे दर्शन घेण्यापेक्षा मार्गदर्शन घ्यावा असा मौखिक सल्ला त्यांनी यावेळी दिला.अध्यात्मिक केंद्रात प्रश्नोत्तराच्या विभागातून विनामूल्य दु:ख मुक्त करीत असतात. तुळशी माळ हातात घेवून रामदास स्वामींचे 108 वेळेस जप करण्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर स्वामी आपल्याला आयुष्यभर सांभाळून घेतात.त्यामुळे दिवसातून एकवेळेस अन्नदान करून पंचमहायज्ञ करण्याचे यावेळी उपस्थितांना सांगितले.संत मुक्ताबाई,संत ज्ञानेश्वर अशा थोर महान व्यक्तीसारखी कर्तव्यवान पिढी घडवायची असेल तर येथे शाळांचे शिक्षण काहीच कामाचे नसते.हे फक्त पोटभरु शिक्षण आहे.परंतु पुढची पिढी सुसंस्कृत पाहिजे.संस्कार केले तर संस्कृती टिकेल.संस्कृती टिकवून राहीली तर धर्म टिकेल.आणि धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल.असे श्री स्वामी समर्थ गुरूपीठ त्र्यंबकेश्वरचे विश्वस्त चंद्रकांत मोरे यांनी सांगितले.यावेळी पंचायत समितीचे सभापती भागवत रक्ताटे,सौ.योजनाताई देशमुख,किरणताई तौर,नानासाहेब उगले,सरपंच बप्पासाहेब तांगडे,सुशिल तांगडे,पांडुरंग महाराज आनंदे,बुरकुले,किशोर शिंदे,राजकुमार वायदळ,नवनाथ मोगरे,आनंद मोगरे,विठ्ठल मोगरे,गोपाल तांगडे,यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.