शाळा सुरू करणे गरजेचे पालकातून होतेय मागणी ;विशेष ग्राऊंड रिपोर्ट
लेखक /गणेशराव खिस्ते
शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील शाळा , महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे . शाळा अशाच बंद राहिल्या तर विद्यार्थ्यांचे कधीही भरून न निघणारे मोठे शैक्षणिक नुकसान होईल . त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करून ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालये सुरू करावे , अशी मागणी भुसारमालाचे व्यापारी दिनेश बलरावत व ईतर चिंताग्रस्त पालकांनी केली आहे . महाराष्ट्र राज्यात शहरी भाग वगळता ग्रामीण भागात कोरोनाचा धोका सध्यातरी नाही . मग ग्रामीण भागात विषाणूचा संसर्ग झाला नसताना शाळा महाविद्यालये बंद करण्यात आले आहे .
हे मात्र ग्रामीण भागातील शाळा बंद करणे शिक्षणाच्या दृष्टीने चुकीचे ठरत आहे. असे चिंताग्रस्त पालकांचे मत आहे . मात्र या उलट काही अटी व शर्तीवर दारू दुकाने , बार , रिसॉर्ट हॉटेल सुरू ठेवण्यात आली आहे. मागील दोन वर्षापासून ग्रामीण भागातील मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकल्या गेले आहेत . ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा प्रभाव पाहिजे त्या
प्रमाणात ग्रामीण भागात फारसा झाला नाही . ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा पहिली ते चौथी ते पाचवी पर्यंत काही ठिकाणी
१ ते ७ तर मोठ्या गावात १० पर्यंत वर्ग आहेत . काही गावात ४० ते ५० तर मोठ्या गावात १०० ते २००च्या वर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . त्यामुळे नियोजन केल्यास कोरोना काळातील नियमांचे पालन करून या शाळा व्यवस्थितपणे चालवल्या जाऊ शकतात . जोपर्यंत
विषाणूंचा प्रादुर्भाव ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ग्रामीण भागातील शाळा बंद करण्यात येऊ नये , अशी मागणी पालकांनी केली आहे . गरजेनुसार शाळेत ५० टक्के किंवा वर्गनिहाय विद्यार्थी उपस्थित ठेवण्याचे नियोजन करून शाळा पुन्हा सुरू कराव्यात . यामुळे मुलांचे नुकसान होणार नाही , असे मत काही प्रतिष्ठित नागरिक व पालक वर्गातून व्यक्त करीत आहेत .
ग्रामीण भागात मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव नसताना शाळा , महाविद्यालये बंद होती . यात मुलांचे मोठे नुकसान झाले . यावर्षी ग्रामीण भागात अद्याप कोरोनाचा संसर्ग झालेला नाही . अशा स्थितीत शाळा व महाविद्यालये बंद ठेवली तर मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे . त्यामुळे विद्यार्थी व पालकांचे हित लक्षात घेता शाळा महाविद्यालय सुरू ठेवावीत .
चिंताग्रस्त पालक ,भगवान पालकर मोहळाई