घनसावंगी नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात
जांब समर्थ प्रतिनिधी
घनसावंगी नगरपंचायती निवडणूकसाठी दि.21 डिसेंबर व 11 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी दि.19 जानेवारी रोजी तहसील कार्यालयात झाली.या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकहाती सत्ता मिळवत 10 जागेवर विजय मिळवला.तर प्रतिस्पर्धी शिवसेनेला 7 जागेवर समाधान मानावे लागले.
भाजप, काग्रेस,अपक्षाला खातेही उघडता आले नाही.महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी बालेकिल्लावर निर्विवाद यश मिळवित शिवसेनेला धोबीपछाड दिला आहे.या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मंत्री राजेश टोपे यांच्यासह शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हिकमत उढाण यांनी नगरपंचायतीत यश मिळविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती.मात्र, नामदार राजेश टोपे हे सर्वच प्रभागात सर्व व्यूहरचना आखीत सत्ता प्रस्थापित ठेवण्यासाठी यशस्वी ठरले.
या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राठोड विघ्नहार,प्रभाग क्रमांक 2 मधून शिवसेनेचे यादव देशमुख,प्रभाग क्रमांक 3-मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत देशमुख,प्रभाग क्रमांक 4 -मधून शिवसेनेचे उज्वला साळवे,प्रभाग क्रमांक 5-मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे जमील रशीद सौदागर ,प्रभाग क्रमांक 6-मधून राष्ट्रवादीचे शेख मुमताज, प्रभाग क्रमांक 7-मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सलीमाबी सय्यद, प्रभाग क्रमांक 8- मधून शिवसेनेचे शिवाली शंतनु देशमुख, प्रभाग क्रमांक 9- मधून शिवसेनेचे फराहत मुजाहिद खान,प्रभाग क्रमांक 10-मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्मिता मिलिंद काळे,प्रभाग क्रमांक 11-मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे पांडू कथले,प्रभाग क्रमांक 12-मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे शोभा दादाराव गायकवाड, प्रभाग क्रमांक 13-मधून शिवसेनेचे बापू कथले,प्रभाग क्रमांक 14-मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश्री प्रल्हाद नाइक,प्रभाग क्रमांक 15 – मधून शिवसेनेचे रेहनाबी फय्याद,प्रभाग क्रमांक 16- मधून शिवसेनेचे जयश्री सचिन देशमुख,तर प्रभाग क्रमांक 17 मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश हिवाळे यांनी दणदणीत विजय मिळविला आहे.आता नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.