घनसावंगी तालुका

संजय बियाणी यांच्या हत्येचा निषेधार्थ कुंभार पिंपळगाव कडकडीत बंद

जालना :– नांदेड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक , तरूण समाजसेवक , समाजशील व्यक्तीमत्व असलेले श्री संजयजी बियाणी यांची ५ एप्रिल रोजी अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली त्या निषेधार्थ आज दि. ८ एप्रिल २०२२ रोजी कुंभार पिंपळगांव येथील सर्व समाजबांधवांनी व व्यापारी बंधुनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन श्री संजयजी बियाणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि हत्येचा तीव्र निषेध करून उपस्थित सर्व समाजबांधवांनी मुकमोर्चा काढून या हत्येचा केंद्रीय उच्चस्तरीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून तपास करून संजय बियाणी यांच्या मारेकऱ्यांना आणि मुख्य सुत्रधारास कठोर शिक्षा द्यावी असे पोलिस प्रशासनाला निवेदन दिले व हत्येच्या निषेधार्थ आज कुंभार पिंपळगांव येथील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून आपला निषेध व्यक्त केला.

images (60)
images (60)


यावेळी जिल्हा परिषदसदस्य श्री अंशिराम कंटुले , व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री दत्तात्रेय कंटुले , व्यापारी महासंघाचे पदाधिकारी अतुल बोकन , विजय कंटुले , प्रकाश कंटुले , प्रविण दहीवाळ , हारूणभाई , संदीप कंटुले , ग्रामपंचायत सदस्य दिलीप राऊत , शिवाजी कंटुले , अतुल कंटुले , भागवत राऊत , वैभव कुलकर्णी , विष्णु आनंदे , शफीक कुरेशी , समाजातील ज्येष्ठ सुरेशभाऊ पंडा , रामगोपाल दाड , नंदलाल कासट , सत्यनारायण तापडिया , अशोक लाहोटी , राधेश्याम लोया , ओमप्रकाश राठी , डॉ. नवगजे , सत्यनारायण चांडक , महेशकुमार दाड , ओमप्रकाश लोया , संतोष पल्लोड, गिरधारी राठी , राहुल पंडा, दिलीप बजाज , केदार कासट , सुरेश लोया , राधेश्याम धुत , गोविंद चांडक , संतोष लोया , सुनिल बजाज , कैलास दाड , मुकेश तापडिया , किरण राठी , विठ्ठल तापडिया , पवन कासट , मयुर तापडिया , अनिल मुंदडा , अनिल दाड , शिवजी चांडक , गणेश सोमाणी , दिपक ओझा , दिनेश लाहोटी , दिनेश दाड , जुगलकिशोर दाड , जगदीश जोशी , गणेश चांडक , अक्षय बजाज , कृष्णा बाहेती , नरेंद्र जोगड , अमित पंडा , शिवनारायण दाड , अक्षय चांडक , दर्शन तापडिया , किशोर राठी , गोविंद लढ्ढा , संतोष कासट , संजय मुंदडा , सुनिल मुंदडा , जीवन दायमा , बालाप्रसाद दाड तसेच पत्रकार बंधु लक्ष्मीकांत कुलकर्णी , अशोक कंटुले , किशोर शिंदे , भागवत बोटे , कुलदीप पवार , विठ्ठल काळे , कौतिक घुमरे व सर्व समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!