विरेगव्हाण तांडा येथे हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार मुर्तीप्राण प्रतिष्ठापणा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण तांडा येथे लोकवर्गणीतून बांधण्यात आलेल्या हनुमान मंदिराचे जीर्णोद्धार,मुर्तीप्राण प्रतिष्ठापणा व कलशारोहण सोहळाचे आयोजन करण्यात आला आहे.त्यानिमित्ताने
दि.१९ ते २१ आगस्ट या दरम्यान तीन दिवस होमहवन,मुर्ती जलपूजन,अभिषेक,हरीपाठ,आदी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहे.तर दि.२१ रविवार रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून परमपूज्य महान तपस्वी संत श्री.योगानंद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत कलशारोहनाचा कार्यक्रम होणार आहे.त्यानंतर महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता होईल. तरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, वारकरी,गायक,महिला, तरूण युवक मंडळ, भाविक भक्तांनी आयोजित कार्यक्रम व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ व तरूण मित्रमंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.