घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
दिव्यांग लाभार्थ्यांना तपासणीस नेण्यासाठी प्रहारचे म्हस्के यांनी घेतला पुढाकार
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
समाजकल्याण विभाग व आरोग्य विभाग जालना यांच्यावतीने घनसावंगी येथील ग्रामीण रुग्णालयात दि.१० ते १४ दरम्यान दिव्यांग तपासणी प्रमाणपत्र वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबीर यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश गायकवाड यांनी योग्य नियोजन केले आहे.दिव्यांगाना ये-जा करण्यासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातंर्गत रूग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे.यासाठी प्रहार संघटनेचे घनसावंगी तालुकाध्यक्ष अनिरूद्ध म्हस्के, आम्रपाली म्हस्के,पंचायत समितीचे विस्तार अधिकारी खिल्लारे,सुभाष खरात,चालक अनिस पठाण,आशासेविका कालिंदा सस्ते,शिवकन्या लोंढे यांच्यासह आदी परीश्रम घेत आहेत.