मंठा तालुका

प्रा. अच्युत मगर यांचा सेवा गौरव कार्यक्रम संपन्न..

मंठा/ मानसिग बोराडे

images (60)
images (60)


स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे वरिष्ठ प्रा. ए .एल मगर हे नियत वयमानानुसार सेवानिवृत्त झाले .त्यानिमित्ताने मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयातर्फे त्यांचा सेवा गौरव कार्यक्रम घेण्यात आला.
या सेवा गौरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा कृषी उत्पन्न बाजार समिती परतुर चे सभापती कपिल भैया आकात हे होते . तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. माणिकराव थिटे व प्रा. डॉ. सुधाकर जाधव हे होते. सेवा गौरव कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात बोलताना उपप्राचार्य संभाजी तिडके यांनी प्रा. मगर सर यांच्या कार्याचा आढावा घेतला. सेवा गौरव पूर्व मनोगत व्यक्त करताना प्रा. मगर सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आदरणीय स्व.कै.वैजनाथ दादा व स्व.कै बाबासाहेब भाऊ आकात यांनी मला या संस्थेमध्ये काम करण्याची संधी दिली त्यामुळे मी या परिसरातल्या विद्यार्थ्यांना घडवू शकलो. मी केलेल्या कामावर मी समाधानी आहे कारण हजारो विद्यार्थी घडवण्याचे भाग्य मला आकात परिवारामुळे लाभले,आहे .असे मत त्यांनी व्यक्त केले पुढे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे प्राचार्य माणिकराव थिटे यांनी मगर सर यांनी केलेल्या ज्ञानदानाच्या कार्याबद्दल आढावा घेऊन त्यांना भावी जीवनाबद्दल आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात बोलताना संस्थेचे सचिव कपिल आकात यांनी सांगितले की प्रा. अच्युत मगर यांनी 1997 पासून अकरावी व बारावी विज्ञान शाखेची जबाबदारी पूर्णपणे सांभाळून या भागातील शेकडो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचे आयुष्य भराचे कल्याण केले आहे .कारण त्यांचे विद्यार्थी शेकडो शिक्षक, डॉक्टर ,इंजिनियर ,फार्मसी ,अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत .आणि त्यांच्या कामाची पावती म्हणून आज त्यांची तिन्ही मुले डॉक्टर झाली आहेत व ते चांगल्या प्रमाणात यश संपादन करत आहेत असे सांगून त्यांनी प्रा. मगर सरांना भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. पुढे कार्यक्रमांमध्ये प्रा. मगर सरांचा मुलगा डॉ. तुषार व मुलगी डॉ. तृप्ती यांनीही आपले मनोगत व्यक्त केले .सर्व सहकाऱ्यांनी प्रा. मगर सरांना निरोप देताना वातावरण अत्यंत भावुक झाले होते. या कार्यक्रमासाठी असंख्य पाहुणे उपस्थित होते. त्यामध्ये सेवानिवृत्त प्राचार्य .मोरे नाना बबनराव गनगे,शिवाजी जाधव, गंगाधर ठोंबरे, उद्धव निर्वळ, हे उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ. चारुलता पाटील यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपप्राचार्य संभाजी तिडके ,प्रा. रमेश शिंदे ,प्रा.आर के मोरे, प्रा.संतोष रंजवे प्रा.परमेश्वर शेळके प्रा.संदेश राठोड, प्रा.पंढरीनाथ काकडे, प्रा. सचिन नरोटे ,प्रा. नारायण खरात यांनी सहकार्य केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!