बाणेगाव ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ..
जालना/प्रतिनिधी
समृध्दी साखर कारखान्याचे चेअरमन तथा भारतीय जनता पक्षाचे नेते श्री सतिशराव घाटगे साहेब यांच्या हस्ते बाणेगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत बाणेगाव येथे जलजिवन मिशन मधुन मंजूर करण्यात आलेल्या ५३ लक्ष रुपयांची पाणीपुरवठा योजना तसेच मातोश्री पांदन रस्ता मधुन बाणेगाव ते लिंगसेवाडी रस्ता बांधकाम व सौंदलगाव येथे जलजिवन मिशन मधुन ६० लाख रुपयांची पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करण्यात आले
या वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात कामं मंजूर करुनही लोकांनी ग्रामपंचायत निवडणुकीत पुरुषोत्तम उढाण यांच्या पॅनल ला डावलल्याची खंत सतिशराव घाटगे पाटील यांनी व्यक्त केली तसेच पुन्हा नव्या जोमाने पुढील निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या या वेळी उपस्थित सतिशराव घाटगे पाटील, पुरुषोत्तम उढाण,अमजद पठाण,शेरखा पठाण, बाळू भंडारे, अंगद उढाण, भरत उढाण, किसन उढाण, पांडुरंग शिंदे, बाळू कदम, रामेश्वर लहाने, अंकुश कारके, अशोक डोंगरे, नंदकिशोर जंगले,सुदाम जाधव, दत्तात्रय उढाण, गणेश फलके, भाऊसाहेब उढाण, महादेव सुरवसे, भाऊसाहेब गाडे, महादेव जंगले यांच्या सह अनेक गावकरी उपस्थित होते