जालना जिल्हादिवाळी अंक २०२१

जालना जिल्हाधिका-यांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी

जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे झाली बैठक

images (60)
images (60)

     जालना दि. 17 :- शासनाने लॉकडाऊन टप्पानिहाय उघडण्याबाबतच्या लागु केलेल्या उपाययोजना व त्यात नमुद मार्गदर्शक तत्त्वे दि. 31 मार्च 2021 पर्यंत अंमलात राहतील असे आदेशीत केले असुन त्यानुसार जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण  रविंद्र बिनवडे यांनी त्यांना प्राप्त अधिकारान्वये संपुर्ण जालना जिल्ह्यात खालील प्रमाणे उपाययोजना दि. 31 मार्च 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत लागु राहणार असल्याचे निर्देश जारी केले आहेत.  

सर्व शॉपिंग मॉल यांच्यासाठी नियम.

            योग्यरीत्या मास्क परिधान केल्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये, तापमान मापक यंत्राचा उपयोग करुन ताप असलेल्या व्यक्तींना प्रवेश देण्यात येऊ नये, सोईस्कर ठिकाणी पुरेश्या प्रमाणात हँड सॅनिटायझर ठेवण्यात यावे, येणा-या प्रत्येक व्यक्तीने मास्क परिधान करणे व सामाजिक अंतर राखणे याचे नियोजन करण्यासाठी संबंधीत आस्थापनेने पुरेसे मनुष्यबळाचा वापर करावा,शॉपींगमॉल अंतर्गत असलेल्या सिनेमागृहे, चित्रपटगृहे किंवा अन्य आस्थापना असल्यास त्या सदरील नियमांचे व यापुर्वी लागु केलेल्या सर्व केलेल्या सर्व नियमांचे योग्यरीत्या पालन करीत असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी ही मॉल व्यवस्थापनाची राहील.

    या आदेशाचा भंग झाल्यास, संबंधीत शॉपींग मॉल हे केंद्र सरकारकडुन कोविड -19 हा साथीचा रोग महामारी म्हणुन अधिसुचित असेल त्या कालावधीपर्यंत बंद करण्यात येतील. तसेच उल्लंघन केल्याबद्दल आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत दंडनिय कारवाईस पात्र राहील.

         सामाजिक,सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना, मेळावे यांना प्रतिबंध राहील. लग्न समारंभात 20 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी राहणार नाही. अंत्यविधीसाठी 20 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी राहणार नाही. स्थनिक प्रशासन, यंत्रणा यांनी याबाबत खात्री करावी. उल्लंघन झाल्यास, संबंधीत, मालमत्ता मालकावर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल त्याचप्रमाणे संबंधीत जागा, मालमत्ता केंद्र सरकारकडुन कोविड-19 हा साथीचा रोग महामारी म्हणुन अधिसुचित असेल त्या कालावधीपर्यंत बंद करण्यात येईल.

       गृह अलगीकरण खालील निर्बधांच्या अधिन राहुन करण्यात येईल.

         अशा व्यक्ती संदर्भात माहिती स्थानिक अधिका-यांना देण्यात यावी व ज्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या देखरेखीखाली हे गृह अलगीकरण करण्यात आले आहे ती माहिती  स्थानिक अधिका-यांना देणे बंधनकारक राहील, संबंधीत व्यक्तींच्या घरातील मुख्य प्रवेशद्वार किंवा ठराविक ठिकाणी कोविड -19 रुग्ण असल्याबाबत 14 दिवसांसाठी बोर्ड लावावा, गृह अलगीकरणे बाबतचा शिक्का कोवडि -19 पॉझिटिव्ह रुग्णावर उमटवावा, कोविड -19 रुगांच्या कुटुंबातील सदस्यांनी बाहेर जाणे शक्यतोवर टाळावे. अपवादात्मक परिस्थिती असल्यास मास्क परिधान केल्याशिवाय जाऊ नये, या निर्बंधांचा भंग करणा-या व्यक्तीस तात्काळ स्थानिक प्रशासनाने कोविड सेंटरमध्ये स्थलांतरीत करावे.

   सर्व कार्यालये आरोग्य व अत्यावश्यक सेवा वगळता 50 टक्के उपस्थितीत सुरु राहतील. वर्क फ्रॉर्म होमला प्राधान्य द्यावे. कार्यालयाकडुन या निर्बंधाचे उल्लंघन झाल्यास केंद्र सरकारकडुन कोविड -19 हा साथीचा रोग महामारी म्हणुन अधिसुचित असेल त्या कालवधीपर्यंत बंद करण्यात येतील. तसेच उल्लंघन केल्याबद्दल आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत दंडनिय कारवाईस पात्र राहील.

      त्याचप्रमाणे सर्व धार्मिक स्थळांचे विश्वतांचे व्यवस्थापनांनी जागेची उपलब्धतेप्रमाणे प्रति तास योग्य शारिरीक अंतर ठेवुन जास्तीत जास्त एकत्रित भाविकांची संख्या निर्धारित करुन जाहीर करोव व त्याबाबतचे व्यवस्थापन करावे. असे निर्देश देण्यता येतात की  या ठिकाणी भेटींसाठी ऑनलाईन आरक्षणासारखी सोयीची यंत्रणा सुरु करण्याबाबत विचार करावा. या ठिकाणी प्रवेशासाठी  खालील निर्बंध राहतील.

       योग्यरीत्या मास्क परिधान केल्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये, तापमान मापक यंत्राचा उपयोग करुन ताप असलेल्या व्यक्तींना प्रवेश देण्यात येऊ नये, सोईस्कर ठिकाणी पुरेश्या प्रमाणात हँड सॅनिटायझर ठेवण्यात यावे, येणा-या प्रत्येक व्यक्तीने मास्क परिधान करणे व सामाजिक अंतर राखणे याचे नियोजन करण्यासाठी संबंधीत आस्थापनेने पुरेसे मनुष्यबळाचा वापर करावा.

        हे आदेश व पुर्वीचे सर्व आदेश या आदेशासह संरेखित केल्या जातील आणि दि. 31 मार्च 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत अंमलात राहतील.

     कुठल्याही संस्था, समुह, आस्थापना,व्यक्तींकडुन या आदेशातील सुचनांचे उल्लंघ्ज्ञन झाल्यास त्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 नुसार कारवाई केली जाईल त्यासोबतच भारतीय दंड संहितेच्या कलम 188 नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल. असे जिल्हादंडाधिकारी व अध्यक्ष जिल्हा  आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी एका आदेशाद्वारे कळविले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!