जालन्यात कोरोनासाठी उपयोग येणारे रेमडेसीवीर आता केवळ चौदाशे रुपयांमध्ये
अन्न व औषध विभागाच्या श्रीमती अंजली मिटकर यांच्या प्रयत्नातुन रेमेडीसेवीर इंजेक्शन आता जालन्यामध्ये केवळ 1 हजार चारशे रुपयांना मिळणार आहे.
जालना, दि. 18 (न्यूज ब्युरो ) :- कोरोना साथीने अनेक प्रकारच्या औषधांच्या मार्यादा स्पष्ट केल्या आहेत. काही औषधे या आजाराच्या उपचारप्रक्रियेत प्रभावी ठरली नाहीत. परंतु रेमेडीसेवीर इंजेक्शनने संजीवनीची भूमिका बजावली. या इंजेक्शनची किंमत जास्त असल्याने सर्वच कारोना रुग्णांना हे इंजेक्शन घेणे परवडले नव्हते. सर्वसामान्य व्यक्तीलाही हे इंजेक्शन परवडावे यादृष्टीने जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्या पुढाकारातुन व अन्न व औषध विभागाच्या श्रीमती अंजली मिटकर यांच्या प्रयत्नातुन रेमेडीसेवीर इंजेक्शन आता जालन्यामध्ये केवळ 1 हजार चारशे रुपयांना मिळणार आहे.
रेमेडीसेवीर इंजेक्शनच्या आकारण्यात येणाऱ्या दराबाबत नुकतीच कोविड रुग्णालय संलग्न औषध विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये प्रशासनातर्फे रेमडेसिवीर इंजेक्शन सर्व कोविड संलग्ण औषध विक्रेत्यांनी मुळ किंमतीपेक्षा (MRP) पेक्षा कमीत कमी किंमतीत रुग्णांकरीता उपलब्ध करण्याचे आवाहन कण्यात आले. सर्व कोविड रुग्णालय संलग्न औषध विक्रेत्यांनी त्यास सहमती दाखवली असुन पुरवठा धारकाच्या दरानुसार दर बदलन्याच्या शर्तीवर रेमडेसिवीर इंजेक्शन साधारणत: 1 हजार 400 रुपये प्रती व्हायल या किमतीला उपलब्ध करुन देण्याचा निर्णय कोविड रुग्णालय संलग्न औषध विक्रेत्यांकडुन घेण्यात आला. हे इंजेक्शन दीपक हॉस्पीटल, विवेकानंद हॉस्पीटल, जालना क्रिटीकल केअर सेंटर, जालना हॉस्पीटल, नवजीवन हॉस्पीटल, आस्था हॉस्पीटल, संजिवनी हॉस्पीटल, शतायु हॉस्पीटल, यासह सर्व कोविड रुग्णालय संलग्न औषध विक्रेत्यांकडे उपलब्ध असुन प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्र, संभाजी नगर इथेही कमी दरात उपलब्ध करण्यात आले आहे.