दिवाळी अंक २०२१

ग्रा.पं.शिवणगाव : सरपंच सौ शकुंतला विजय तौर यांच्या हस्ते ध्वजारोहन

सरपंच,उपसरपंच,सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी

प्रतिनिधी : नितिन राजे तौर

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातिल शिवणगाव ग्रामपंचायत कार्यालयावर नवनिर्वाचित महिला सरपंच सौ.शकुंतला विजयकुमार तौर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहन करून जिल्हा परिषद शाळेतील ध्वजारोहन पार पडले दरम्यान विद्यार्थ्यांचे भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सरपंच यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य,उपसरपंच व सदस्य यांच्या वतीने वही, पेन,कंपास पेटी,सामान्य ज्ञानाचे पुस्तके व खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी उपसरपंच पदमाबाई दगडू तौर,सदस्य कैलास रंगनाथ तौर,सरस्वती उत्तम मोरे,राणी उमेश तौर,अमोल भास्कर तौर,दिव्या बाळासाहेब तौर,अमित अशोकराव तौर,ग्रामसेवक के बी वखरे,जि प शाळा मुख्याध्यापक एस पी तौर,सहशिक्षक वाय जी डावकर ,पी आर राऊत, डी बी चोपडे ,संगणक परिचालक नितीन तौर,पाणी पुरवठा सेवक गोविंद तौर,शिपाई लहू मोरे, अंगणवाडी सेविका शोभा तौर हे उपस्थित होते..

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!