कुंभार पिंपळगाव परीसरातून ३० हजार टन अतिरिक्त ऊसाचे गाळप-अशोक जाधव
कुंभार पिंपळगाव परीसरातून ३० हजार टन अतिरिक्त ऊसाचे गाळप-अशोक जाधव
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यात ऊसाचा प्रश्न गंभीर बनला असून कार्यक्षेत्रा बाहेरील कारखान्यानी कुंभार पिंपळगाव परीसरातून ३० हजार टन अतिरिक्त ऊस गाळप केले आहे.१ लाख टनापेक्षा जास्त गाळप होणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली.
यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली होती. अतिरिक्त शेतकऱ्यांचा ऊस कार्यक्षेत्रा बाहेरील कारखान्यास ऊस गाळपासाठी जात आहे.यामध्ये पलशीद्ध साखर कारखाना मेहकर, रामेश्वर साखर कारखाना भोकरदन,जय महेश साखर कारखाना माजलगाव या कारखान्याची जवळपास चाळीस टोळी कार्यरत आहेत.
यात पलशीद्द कारखान्याची २५ टोळी, रामेश्वर कारखाना ८ टोळी व दोन हार्वेस्टर रामेश्वर व जय महेश या कारखान्याची प्रत्येकी ५ टोळी व २ हार्वेस्टर तसेच जय महेश या कारखान्याची २ टोळी उपलब्ध आहे.शेवटच्या हंगामात जोरात काम सुरू असून १५ मे पर्यंत कारखाना चालू राहणार आहे.व कुंभार पिंपळगाव परीसरातून साधारणपणे एक लाख टन ऊसाचे गाळप होणार आहे.
कुंभार पिंपळगाव परीसरात विरेगव्हाण,विरेगव्हाण तांडा, कुंभार पिंपळगाव, अरगडे गव्हाण, लिंबोणी, नाथनगर, शिवणगाव, राजाटाकळी, उक्कडगाव, पिंपरखेड, मुर्ती, लिंबी,धामणगाव, देवी दहेगाव, राजुरकर कोठा,नागोबाची वाडी आदी गावांमध्ये ४० ऊस तोडणी टोळ्या दाखल झाले आहेत.
कुंभार पिंपळगाव परीसरातून ३० हजार टन ऊसाचे गाळप झाले आहे.व आणखी काही टोळ्या दाखल होणार असून त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली.