कुंभार पिंपळगावात एटीएम कार्ड बँक देते दारात , परंतु चालू करायला जावे लागते जालना शहरात..!
एटीएम असून उपयोग नसून ग्राहकांचा खोळंबा
कुंभार पिंपळगाव-
जालना जिल्ह्यात ग्रामीण भागाचा आर्थिकस्तर उचवण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र ,ग्रामीण बँक, कँनरा बँककडे पाहिले जाते घनसावंगी तालुक्यातील महत्वाच्या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखा आहेत परंतु मागील एक ते दोन वर्षांपासून मात्र बँक ऑफ महाराष्टच्या घनसावंगी तालुक्यातील सर्वच शाखेतील एटीम मशीन मात्र आऊट ऑफ रिच झाल्याने जुन्या ग्राहकांपेक्षा मात्र नवीन कार्ड धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे महाराष्ट्र बँकेच्या नवीन ए टी एम कार्ड धारकांना ग्रीन पिन साठी त्याच बँकेचे एटीम मशीन वापरणे बंधनकारक आहे ते वापरल्याशिवाय ते ए टी एमकार्ड कार्यन्हीत होत नसल्याने मात्र कार्ड धारकाची गैरसोय होत आहे.
घनसावंगी तालुक्यात अपवाद वगळता राष्ट्रीयकृत बँक म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखा आहेत यात कुंभार पिंपळगाव,घनसावंगी, राणीउच्चेगाव, रांजणी, ह्या महत्वाच्या बाजारपेठ च्या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखा आहेत परंतु ह्या सर्वच भागातील एटीएम मशीन असून त्या बंद अवस्थेत आहेत यातच कुंभार पिंपळगाव येथिल मशीन तर वर्षांपूर्वी चक्क काढून नेल्याने मोठी गैरसोय होत आहे आता ए टी एम मशीन व खाते सुरू करण्यासाठी जालना सुमारे सत्तर किलोमीटर जावे लागत आहे किंवा एटीएम कार्ड चालू करण्यासाठी परतूर, मंठा, ह्या तालुक्यात जाऊन आपले कार्ड चालू करावे लागत आहे
तर रात्री अपरात्री खात्यावरील रक्कमेची गरज भासल्यास मात्र कार्ड असूनही उपयोग होत नाही तर ग्रीन पिन ऐवजी पर्यायी व्यवस्था बँकेने करण्याची मागणी खातेदारांनी केली आहे किंवा एटीएम मशीन कार्यान्वित करण्यात यावी अशी ही मागणी होत आहे नवीन खातेदाराना तर ए टी एम कार्ड सुरू झाल्याशिवाय खाते वापरता येत नाही हे मात्र विशेष
काय आहे ग्रीन पिन
ग्रीन पिन म्हणजे ज्या बँकेचे एटीमकार्ड आहे त्याच बँकेच्या मशीन मध्ये जाऊन सर्वप्रथम कार्ड एंटर करावे त्यानंतर आठ तासाने एक वन टाइम ओटीपी येतो नंतर चोवीस तासात तो ओटीपी टाकून नवीन पिन टाकावा लागतो यासाठी त्या बँकेच्या एटीएम मध्ये 24 तासात दोनदा जावे लागेल नसता परत पहिल्यापासून प्रोसेस करावी लागते परतु त्या भागात एटीएम मशीन नसलेल्या ग्राहकांनी पिन कशा घ्यावा हा प्रश्न निर्माण झाला आहे किंवा दोन दिवस पिन साठी बाहेर गावी राहण्याची वेळ घनसावंगी तालुक्यातील ग्राहकावर आली आहे
गावात तीन राष्ट्रीयकृत बँका एकही ए टीएम मशीन नाही
घनसावंगी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले कुंभार पिंपळगाव येथे तीन राष्ट्रीयकृत बँका असून त्यात बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक,ग्रामीण बँक याचा समावेश आहे परंतु तिन्ही बँकेचे ए टी एम च नसल्याने मात्र खातेदाराना अडचण निर्माण होत आहे
कुंभार पिंपळगाव चे ए टी एम मशीनच काढून नेले-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे एकच राष्टीयकृत बँके असून वर्षभरापूर्वी ए टी एम मशीन काढून नेले असल्याने खातेदाराची मोठी गैरसोय होत आहे
गावात बँक ऑफ महाराष्ट्राचे एकच शाखा असून सुमारे पन्नास गावात संपर्क असलेला बँक ऑफ महाराष्ट्रा च्या शाखेचे एटीएम मशीन मागील सहा महिन्यांपासून पूर्ण बंद आहे त्यामुळे एटीएम ग्राहकांची गैरसोय होत आहे महाराष्ट्र बँकेचे चे ए टी एम वर्ष ते दोन वर्षांपासून काढून नेल्याने खातेदारांना एटीएम मधून पैसे काढणे साठी तारेवरची कसरत करावी लागत आहे
आहे कुंभार पिंपळगावसह, अरगडेगव्हाण , पिंपरखेड ,गुंज ,जाम समर्थ, विरेगाव ,भादली, शिवणगाव, उक्कडगाव ,राजाटाकळी, नाथ नगर ,मूर्ती,लिंबी ,दहेगाव, मासेगाव ,पाडोळी या गावाचा कुंभार पिंपळगाव दररोजचा संपर्क आहे परंतु एटीएम नसल्याने वापस जावे लागते