घनसावंगी तालुका

जांबसमर्थ येथे विद्युत तार तुटून पडल्याने ३ एकर ऊस जळाला !

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील तीर्थक्षेत्र जांबसमर्थ येथे विद्युत वाहिंनीची तार तुटून पडल्याने तीन एकर ऊस जळाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.या घटनेत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.जांबसमर्थ शिवारातील गट नंबर २३० मध्ये शेतकरी कोंडीबा देवराव मोगरे यांच्या शेतातील तीन एकर उसाला विजेच्या तारा तुटल्याने अचानक आग लागली.त्यामध्ये तीन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना २२ मार्च सोमवारी रोजी दुपारी ही आग लागली. या आगीत कोंडीबा मोगरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.धूरांचे प्रचंड लोट सुरू झाल्याने गावातील लोकांनी जळणाऱ्या ऊसाकडे धाव घेतली.आग मोठ्या प्रमाणात असल्याने आटोक्यात आणणे शक्य झाले नाही.यावेळी संबंधित शेतमालक व महावितरण चे सहाय्यक अभियंता श्री.प्रदीप कांबळे, कर्मचारी दिनकर हिवाळे, दिनू पवार, इतर गावकरी यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.तरी संबंधित ठिकाणी तलाठी यांनी सदर घटनेचा पंचनामा करून शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!