बुधवारी जालना जिल्ह्यात कोरोनाचे एकाच दिवशी आठ जणांचा बळी
जालनेकरानो आता सावधान; बुधवारी ४५३ जण पॉझिटिव्ह तर ८ कोरोना बधितांचा मृत्यू
जालनेकरानो आता सावधान; बुधवारी ४५३ जण पॉझिटिव्ह तर ८ कोरोना बधितांचा मृत्यू
जालना ब्युरो दि २४ मार्च
मागील पंधरा दिवसापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून बळी च्या संख्येत ही वाढ झाली आहे जालना जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव गतीने वाढत असून गेल्या आठ दिवसांत सुमारे चार हजार रुग्ण च्या आसपास पॉझिटिव्ह आढळले आहेत. बुधवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनामुळे आठ जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे तर आतापर्यत जिल्ह्याची एकूण कोरोना बळी ची संख्या आता साडे चारशे च्या आसपास पोहचली आहे.यातच बुधवारी एकूण ४५३ जण कोरोना बाधित आढळले आहेत
जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही २३ हजार २९६ झाली असुन त्यातील आतापर्यत २०हजार ८४३ रुग्णांना डीचार्ज देण्यात आला आहे तर रविवारी आठ कोरोना बाधिताचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकूण ४५१ जनांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे.
पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णसंख्यामध्ये जालना तालुक्यात २०८ ,मंठा तालुका १७,परतूर तालुका ४६,घनसावंगी तालुका २८,अंबड तालुका ४२ ,बदनापूर २३, जाफराबाद ४२,भोकरदन ३६,इतर जिल्हा ११ असे एकूण ४५३पॉझिटिव्ह आढळून आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अर्चना भोसले यांनी न्यूज जालनाशी बोलताना दिली.