जालना जिल्ह्यात कोरोना युद्धांना मानधन वाढ मिळाली
मधुकर सहाने : भोकरदन
जालना जिल्ह्यात तसेच राज्यात कोरोना महामारी ने थैमान घातले होते आणि त्याच काळात आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी दिवस-रात्र एक करून खांद्याला खांदा लावून रुग्णांची सेवा करत होते यामध्ये कोविड केअर सेंटर असेल डेडिकेटेड कोविड केअर सेंटर असेल किंवा कोविड हॉस्पिटल असतील घरोघरी जाऊन सर्वे करने असतील बस स्थानक टोलनाकी रेल्वे स्थानक सर्व ठिकाणी कोरोनाची तपासणी करणे ही सर्व कामे कंत्राटी कर्मचारी हे इमाने-इतबारे करत होते याचे फळ म्हणून राज्याचे कर्तव्यदक्ष आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सुमारे 22500 कंत्राटी कर्मचाऱ्यांना 252 कोटी रुपयाचा घवघवीत निधी उपलब्ध करून मानधन वाढ करण्याचा निर्णय दिनांक 5 सप्टेंबर 2020 रोजी घेतला होता परंतु तांत्रिकदृष्ट्या थोडा उशीर झाला परंतु राज्यातील 22500 तसेच जिल्ह्यातील सुमारे 450 कंत्राटी कर्मचाऱ्यांना मानधना मध्ये घवघवीत वाढ करण्यात आली.
याबद्दल राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बबलू पठाण यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तसेच पालकमंत्री जालना राजेश टोपे यांचे आभार व्यक्त केले तसेच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष नंदू कासार माजी अध्यक्ष हर्षल बाळासाहेब रणवरे यांचे सुद्धा कर्मचाऱ्यांच्या साठी केलेल्या पाठपुरवठा बद्दल आभार व्यक्त केले तसेच राज्यातील आरोग्य विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी महासंघ ही संघटना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शासन दरबारी दखल असणारी एकमेव संघटना असून निस्वार्थीपणे कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न नेहमी सोडवत असते असे मत राज्य संघटनेचे राज्य संघटक मयुर थारेवाल यांनी सांगितले .
मुख्य कार्यकारी अधिकारी सवडे जिल्हा शल्य चिकित्सक श्रीमती डॉ. अर्चना भोसले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खतगावकर ,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक रावसाहेब शेळके, जिल्हा लेखा व्यवस्थापक प्रशांत घरटे , फायनान्स काम लॉजिस्टिक ऑफिसर बाळासाहेब वाघ , मोहन हिवरे,लेखापाल प्रमोद देशमुख, विद्या मस्के, जिल्हा समन्वयक राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांचे सुद्धा आभार व्यक्त केले यावेळी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.