महाराष्ट्र न्यूज

संगमनेर तालुक्यातील घारगाव,बेटा गावासह परीसरात भुकंपाचे झटके.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील घारगाव, बोटा गावासह आजूबाजूच्या परिसराला आज दुपारी भूकंप सदृश जोरदार धक्का बसल्याने परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

images (60)
images (60)

अनेक वर्षांपासून बोटा गावासह आजूबाजूच्या गावांना यापुर्वीही भूकंपाचे धक्के बसले आहे. धक्क्यांची नोंदही नाशिक येथील मेरी संस्थेच्या भूकंपमापक यंत्रावर झाल्या होत्या.त्यानंतर आज पुन्हा दुपारी धक्के बसले. घारगाव,  बोटा, माळवाडी, कुरकुटवाडी या गावांना भूकंप सदृश जोरदार धक्का बसला. या धक्क्यांची तीव्रता मोठी असल्याची चर्चा परीसरात होत आहे.

नाशिक मेरी संस्थेच्या अधिकाऱ्यांशी या संदर्भात विचारपूसही केली असता या धक्क्यांची नोंद झाली की नाही, ते आपल्याला लवकरच कळवणार असल्याचे तहसीलदार अमोल निकम यांनी सांगितले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!