जालना जिल्हा

सोयाबीन साठेबाजी करून तेलाचे प्रति लिटर ४० रूपये भाव वाढवून दिले संबंधित कंपनी व सोयाबीन साठे केलेले गोडाऊन जप्त करा

मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली मागणी
न्यूज जालना दि २७

images (60)
images (60)

जालना जिल्ह्यातील कोरोना काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सोयाबीन साठेबाजी करून तेलाचे ४० रूपये प्रति लिटर भाव वाढवून दिल्यामुळे सोयाबीन व तेल उत्पादित खाद्यतेल निर्माण करणाऱ्या संबंधित कंपन्यांवर सोयाबीन साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे साठे जप्त करून यावर कारवाई करण्याची मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेहमी सांगतात की, जिथे अन्याय दिसेल तिथे लाथ घाला, म्हणून जालना जिल्ह्यातील तेलात भेसळ करून सोयाबीन खाद्यतेलाचे ४० रुपयांनी भाव वाढले भेसळ करून खाद्यतेल विक्री करणाऱ्या कंपन्या सील करा असे सोळंके म्हणाले.

जालना जिल्ह्यातील कोरोना काळातील झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सोयाबीन साठेबाजी करूण, प्रति लिटर मागे ४० रुपये भाव वाढून दिल्यामुळे, सोयाबीन व इतर तेल उत्पादित धान्य खाद्यतेल निर्माण करणाऱ्या कंपन्यांवर व सोयाबीन साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे साठे केलेले गोडाऊन सील करून जप्त करा ही तत्काळ कारवाई झालीच पाहिजे.

जालना जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातून शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले सोयाबीन अतिरिक्त साठवण केल्यामुळे, कृत्रिम टंचाई निर्माण करून सोयाबीनचे भाव वाढले असे भासवून तेलाचे भाव वाढून दिले, म्हणून सोयाबीन कृत्रिम टंचाई निर्माण करून जनतेला दिशाभूल करत तेलाचे प्रति लिटर मागे ४० रुपये भाव वाढून दिल्यामुळे यांची मोठ्या प्रमाणामध्ये कमाई करून घेत आहेत.

कोरोना दरम्यान च्या काळात सर्वसामान्य जनतेची लूट करणे योग्य नाही, म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहितार्थ पुढाकार घेऊन तेल उत्पादित कंपन्या व साठेबाजी करणारे व्यापारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

जनतेला भोळेभाबडे समजून कोणत्याही मार्गाने लूट करणारे लोक आपल्या महाराष्ट्रात आहेत, खरे तर हे दुर्दैव आहे, अशाप्रकारे गैरफायदा घेऊन सामान्य जनतेची लूट होणे बरोबर नाही,म्हणून ज्या ठिकाणी साठेबाजी केले ज्या कंपन्यांमध्ये तेल भेसळ करून विक्री करण्यास उपलब्ध केल्या जाते.

याबाबत जनहितार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणून आपल्या यंत्र नेला सहकार्य करण्याच्या भावनेतून प्रत्यक्षात सर्व माहिती देणार आहोत. जालना जिल्ह्यात व इतर जिल्ह्यामध्ये चांगले सोयाबीन उत्पादित झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन कमी भावात खरेदी करून सोयाबीनचे भाव साठे केल्यामुळे वाढले आहेत. हे साठे जप्त करून कारवाई केल्यास सोयाबीनचे भाव स्थिर होतील. व तेलाचे सुद्धा भाव कमी होतील.

कोणत्याही परिस्थितीमध्ये सोयाबीन साठेबाजी करणारे व्यापाऱ्यांचे गोडाऊन साठे जप्त व खाद्यतेल तेल उत्पादन करणार्‍या कंपन्या वर योग्य ती कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गोडाऊन वर आंदोलन करून निषेध नोंदवणार आहोत.

जालना जिल्ह्यातील तेल उत्पादित कंपन्यांच्या समोर जाऊन निषेध नोंद घेणार आहोत,खाद्यतेल निर्माण करणाऱ्या सर्व तेल कंपन्यांनी अचानक का भाव वाढवले ही बाब जनतेला कळायला हवी. व मागील वर्षी कोरोना काळात ९५ ते १०० रूपय इतक भाव प्रति लिटर तेलाचा होता,परंतु चक्क एक लिटर मागे चाळीस रुपये वाढ केल्यामुळे जनतेची लूट होत आहे. म्हणून सोयाबीन साठेबाजी करणारे व्यापारी व खाद्यतेल निर्माण करणाऱ्या कंपन्या वर योग्य ती कार्यवाही होणे अपेक्षित आहे.

जालना जिल्ह्यातील सोयाबीन साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे सगळे गोडाऊन सील करून जप्त करावेत व तेल कंपन्या अचानक भाव वाढल्यामुळे व भेसळयुक्त तेल जनतेला पुरवठा करीत असल्यामुळे तेल कंपन्या च्या मालकांचे तेल उत्पादित करण्यासाठी दिलेले परवाने रद्द करून संबंधित साठेबाजी करणारे व्यापारी संबंधित कंपनीचे मालक यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.

योग्य ती कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपल्या कार्यालयात पूर्व कल्पना देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण अथवा लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात येईल,असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष सोळंके यांनी शेवटी दिला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!