संपादकीय

न्यूज जालना चे संपादक रामेश्वर लोया यांचा गौरव

न्यूज जालना परिवाराकडून शुभेच्छाचा वर्षाव

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

कुंभार पिंपळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा न्यूज जालना चे संपादक रामेश्वर लोया यांचा सपत्निक गौरव करण्यात आला.सामाजिक क्षेत्रात त्यांनी नि:स्वार्थपणे काम केले. सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर लोया यांनी गेल्या ३० वर्षांत विविध क्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांचा सपत्निक सन्मान करून गौरविण्यात आले. रामेश्वर लोया यांनी नि:स्वार्थपणे सामाजिक क्षेत्र असो कि राजकिय आपल्या कारकीर्दीत कधी डाग लागू दिला नाही.घरावर तुळशीपत्र ठेवून ते राजकीय, सामाजिक क्षेत्रात सर्व सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून लढले.अन्याय,अत्याचाराविरूद्ध लढा दिला.अशा प्रसंगी पक्षपात, जात ,पात ,पंथ कधी बघितला नाही.कोर्टकचेरी असो की रण मैदान रामेश्वर लोया यांनी कधी माघार घेतली नाही.सदाबहार, प्रसन्न व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांनी अनेकांची मने जिंकली.

गांधीवादी विचार शैलीचे लोया यांनी सामाजिक उपक्रम राबवताना कुणाचे कधी मन दुखावले नाही सामाजिक कार्याबद्दल मूल्यमापन करून मौजे पिंपळी धामणगाव तालुका परतुर येथील ‘जीवन विद्या प्रतिष्ठान ‘ यांच्या वतीने त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यासाठी प्रतिष्ठानचे मुख्य प्रवर्तक दिपकराव कुलकर्णी,समन्वयक बाबासाहेब मोगरे,संघटक विष्णू गुळवे यांनी ६ एप्रिल २०२१ मंगळवार रोजी त्यांच्या निवासस्थानी येऊन त्यांना सपत्नीक सन्मानपत्र बहाल केलं. सौ सुरेखा लोया,प्रा.गणेश कंटूले गजानन शहाणे यावेळी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर लोया यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!