संपादकीय

जातीभेदा विरुद्ध दंड थोपटणारे -महात्मा बसवेश्वर

समतावादाचे जनक क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकातील क्रांतिकारी महापुरुष असून त्यांनी जाती-वर्ण व्यवस्थेविरुद्ध प्रहार केला. महात्मा बसवेश्वर लिंगायत धर्माचे प्रचारक आहेत तसे पाहिले तर भारतातील कालानुक्रमात बारावे शतक हे अत्यंत महत्त्वाचे आहे.एकीकडे संत कबीर, गुजरातमध्ये चांगदेव रावळ, महाराष्ट्रात चक्रधर कर्नाटकात महात्मा बसवेश्वर अशा थोर विभूतींनी बाराव्या शतकात समतेची चळवळ संपूर्ण देशात उभी केली.
शतकापूर्वीच खैबरखिंडीतून आलेल्या जूलमी इस्लामी राज्यकर्त्यांचे हिंसेचे थैमान चालू असते. दुसरीकडे सनातनी वैदिकांची मानव घातकी वर्णव्यवस्था, धर्माच्या नावावर निर्माण केलेली अंधश्रद्धा, उच्चनीचभाव, अस्पृश्यता? जातीभेद, स्त्री-पुरुष भेद, कर्मकांड देव देवीच्या नावावर पुरोहितांनी रूढ केलेली देवदासी प्रथा, यज्ञाच्या वेदीवर दिले जाणारे मुक्या प्राण्यांचे बळी.

images (60)
images (60)

विधवेचे असाह्य जीवन बालविवाह पद्धती, सतीप्रथा अशा अनेक प्रश्नांनी ञस्थ झालेल्या कालखंडांत कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी नावाच्या छोट्या खेडेगावात इ.स.११३१ मध्ये महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला.बसवेश्वरांवर त्यांची मोठी बहीण नागलांबीका यांचे फार मोठे प्रेम होते.

बाल बसवेश्वर आपल्या आई-वडिलांना वेगवेगळी प्रश्न विचारीत असे. घरादारात होत असलेला कुत्र्या-मांजरांचा मुक्तपणे वावर पण विशिष्ट वर्गातील लोकांची दाराबाहेर होत असलेला अभद्र व्यवहार, देवादिकांच्या मूर्तीवरती दुध,दहि,तुप यांच्या सहस्ञ धारांचा अभिषेक पण देवळाबाहेरील मानवांचे अन्न-पाण्यावाचून तडफडणे, सर्वांना मिळत असलेल्या भौतिक व आध्यात्मिक उत्कृष्ठसुविधा पण गावकुसाबाहेरील बांधवांचा होत असलेला अमानुष्य छळ अशा सभोवतालच्या परिस्थितीमुळे निर्माण होत असलेल्या प्रश्नांनी बसवेश्वर सर्वांना गोंधळून टाकायचा.
अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धिमत्तेच्या बसवेश्वर यांनी एका ताम्रपटावर अवघड अशा लेखाच्या आधारे बिज्जल राजास फार मोठ्या खजिन्याचा शोध लावून दिला.महात्मा बसवेश्वर यांची प्रचंड बुद्धिमत्ता प्रभावी राज्य प्रशासन व्यवस्था पाहून आनंदित झालेल्या बीज्जल राजाने आपल्या बहिणीचा म्हणजे निलांबिकेचा ( सिद्धरस राजाची कन्या) विवाह महात्मा बसवेश्वरांबरोबर लावून दिला. इतिहासकाळात राजे, सामंत, सरदार यांच्यात बहुपत्नीत्वाची पद्धत रूढ होती.
महात्वा बसवेश्वर यांची दुसरी पत्नीही सिद्धरस राजाची क्षञीय कन्या म्हणजेच हा विवाह आंतरजातीय विवाह होता.या विवाहास सामाजिक व राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्व होते हे लक्षात येते. दुसर्यांना आंतरजातीय विवाह करण्याचा संदेश देण्यापूर्वीच आंतरजातीय लग्न करणारे महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकातील एकमेव क्रांतिकारी महामानव होते.याची नोंद घेणे आवश्यक आहे.

वचन साहीत्य हे महात्मा बश्वेश्वराच्या जीवनाचा मुळ गाभा आहे.या वचन साहित्याच्या माध्यमातून या जगामध्ये फार मोठी क्रांती झाली.त्या बश्वेश्वरांचा आदर्श पुढे अनेक पिढ्यांपर्यंत चालत आलेला आहे.
महात्मा बसवेश्वर म्हणतात “कायक वे कैलास” म्हणजे श्रम करा, वाघाच्या जातीच जन्माला आलेले असाल तर तुम्ही श्रम करून जगल पाहिजे. मर्दाच्या जातीत जन्माला आलेली माणसे ही श्रम करणारी असतात. नामर्दासारखे जगु नका. असा बाराव्या शतकात घणाघाती हल्ला महात्मा बसवेश्वर यांनी केला आहे.सत्याची बाजू मांडतांना महात्मा बसवेश्वर म्हणतात, शिपाई नाही मी पळपुटा,सर्वनाशाला घाबरणारा
मरण हीच महानवमी
कुडळसंगम अवधारा महात्मा बसवेश्वर म्हणतात मी ढूंगणाला पाय लावून रणांगण सोडून पळणारा नामर्द नव्हे.बसवेश्वर म्हणतात मी जर हे काम करत असताना मेलो तरी चालेल.हेच विचार डाॕ.बाबासाहेब आंबेडकर मांडताना म्हणतात, प्रबोधनाच्या वाटेवर जात असताना गोळ्या घालून ठार केलं तरी मागे वळून पाहू नका, मेले तरी चालेल पुढच्या पिढ्या बदला घेतील पण रणांगण सोडून पळाला तर पुढच्या पिढ्या म्हणतील, आमचा बाप नपुसंक होता म्हणून नपुसकाच्या पंगतीला बसू नका.
त्या काळात स्त्रियांना धर्मामध्ये स्थान नव्हतं आजही नाही २०१४ मध्ये आसाराम बापूंने ‘महान नारी पुस्तकात लिहिलं की विधवा असलेल्या स्त्रीला शुभ कार्यात आणू नये, हे पाप आहे. रजस्व स्त्री ने बनवलेले पापड लाल होतात. असे बुवा-बापू,टापू या देशाला कलंक लावणारे बापू स्त्रियांच्या बाबतीत इतक्या खालच्या पातळीवर जावून बोलतात.स्ञीयांना न्याय देण्याच काम १२ व्या महात्मा बसवेश्वरांने केलेल आहे. या स्त्रियांना बसवेश्वरांनी दीक्षा दिली त्यांना मुक्तीची दालने खुली केली.बसवेश्वरांच अस्पृश्योद्धाराच कार्य,बसवेश्वराच स्त्री उध्दाराच कार्य,बसवेश्वरांनी थोतांडावर केलेले हल्ले.मनुवादी व्यवस्थेविरुद्ध बसवेश्वराने सिंहासने डोलावली.बसवेश्वराने अनुभवमंटप स्थापन केला.त्या काळात धनगर अनुभवमंटपात होते.चन्नय्या मातंग हौता. माचिदेव परीट समाजाचे हे सगळे लोक एकत्र करणाऱ्या बसवेश्वराच्या कुळातले लोक आज सोहोळ,ओवळ पाळतात हे दुर्दैवी आहे. कुळ गोञ बसवेश्वरांना मान्य नाही.बसवेश्वर म्हणतात कोणत्याही कुळ गोञाचा का असेना लिंग धारण करणारा तोच कुलीन.
कुल गोत्र काय शोधता शरण शरणा माझी शरणामध्ये कुळ नाही. जात नाही,गोञ नाही. अस्पृश्य जरी असला तरी त्याचा शेषः प्रसाद ग्रहण करीन. त्याचं उष्ठ सुद्धा मी खाईल. त्यांच्याशी रक्त संबंध जोडीन कुडलसंगम देवां तव शरणावर जीवापाड विश्वास ठेवीन.जे लिंगायत आहेत ते कोणत्याही गोत्राचे असोत, कोणत्याही कुळाचे असोत,कोणत्याही जातीचे असोत, मी जात पाहणार नाही, मातंगांच्या घरीसुद्धा लिंगायतांने प्रसाद सेवन केल्याची उदाहरणे बसवेश्वर देतात.मातंग चन्नय्या हा आमचा कुल टीळक असे कुडलसंगम देवा आम्हीशी तुझ्यापेक्षाही श्रेष्ठ भासे. अरे मी ज्या कुडलसंगमाला मानतो त्यापेक्षाही हा मातंग चन्नय्या मला सर्वश्रेष्ठ वाटतो.


कबीर म्हणतात
जातं न पुच्छो साधू की,
पुछ लिजिए ज्ञान
मोल करो तलवार का
परि रहने दो म्यान
रणांगणामध्ये तलवारीच युद्ध असतं तलवारीला जात विचारली जात नाही. एकत्र यायचे असेल तर जातिनिर्मूलन झालं पाहिजे. ते आज होत नाही हे सर्वात मोठे दुर्दैवं यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करुया………
जातिव्यवस्थेची भाषणं देऊन चालत नाही तर कृती करावी लागते.महात्मा बसवेश्वरांनी ती कृती केली. जातीचा फोलपणा सिद्ध केला. व्यासमुनी भोयिनीचा पुत्र, मातंगाचा पुत्र मार्कंडेय,मंडूकाची कन्या असे मंदोदरी, नका हो नका कुलगोत्र शोधने काही नाही मिळविले कुलगोञाने साक्षात अगस्ती मुनी बेरड जातीचा,धर्म व्यवस्थेने सर्वांचीच जात उच्च सांगितलेली आहे.पण जातीव्यवस्थेचा फोलपणा बसवेश्वराने उघड केला. चांभार जातीचे दुर्वास ऋषी, कश्यप तो लोहार, कोंडीण्य ऋषी तो नाव्ही त्यांची कीर्ती त्रिलोक जानती हो. आमुचा कुडलसंगम देवाचे वचन जाणिजे शुद्ध असले तरी जे शिवभक्त तेच कुलीन. आमचा कूडलसंगमदेव मात्र मार्कंडेय कोण, व्यासमुनी कोण, त्याची जात पहात नाही.जो शिवलिंग धारण करणारा लिंगायत आहे. त्याला खऱ्या अर्थाने मान्यता देतो. जाती निर्मूलनाचा व्यापक दृष्टिकोन मांडताना स्वतःच्या जातीचा उल्लेखा बद्दल काय म्हणतात बसवेश्वर
मातंग चन्नय्याच्या घरच्या दासाचा पुञ
ढोर तक्कय्याच्या घरची दासीकन्या गेले होते शेतात गौवर्या वेचण्या त्या दोघांने तेथे संग केला त्या दोघांच्या पोटी माझा जन्म झाला.


कूडलसंगमदेव याचा साक्षी होय
म्हणजे मी अस्पृश्य समाजाचा होय.असे बसवेश्वर सांगतात.बसवेश्वराने अनुभवमंटप स्थापन केला.वेगवेगळ्या जातीतील व व्यवसायांतील भक्त म्हणजेच शिवशरण तिथे एकत्र जमत आणि विविध विषयांवर चर्चा करीत असत. ही चर्चा लयबद्ध गद्यातून होत असे पुढे ते कन्नड साहित्यामध्ये वचन साहित्याच्या रूपाने प्रसिद्ध झाले.त्याने समाजप्रबोधनाचे विचार पेरले.हे कन्नड भाषेतील वचन साहित्य २३ भाषेत रुपांतरीत झाले आहे.
अनुभवमंटपात शिंपी समाजाचे अबिंदेव, परीट समाजाचे माचिदेव,हरपाल अपना, बोटय्या कुंभार, कलाय्या सोनार, भीमण्णा वडार ,चन्नय्या मातंग, नागोजी कांबळे महार ,मुथय्या कुणबी, पद्मावती जैन असे अनेक जातीचे लोक अनुभवमंटपात होते. अनुभवमंटप म्हणजे त्या काळातील लोकशाही संसद होय.मृत्यूची भीती महात्मा बसवेश्वरांना व बसव अनुयायांना कधीच वाटली नाही. एका वचनात महात्मा बसवेश्वर म्हणतात उद्याचे मरण आजच येवो! आजचे मरण आत्ता येवो!! नाही आम्ही भिणार मरणाला!
नाही जगण्याचा मोह आम्हाला !! आली खरेच जवळ मृत्यू!बसव त्याशीच उत्सव समजू!!


चर्मकार समाजात संत हरळय्या होता.मधुररस हा ब्राह्मण समाजाचा माणूस होता बसवेश्वराच्या विचारांमुळे त्याचा अहंकार गळून पडला.त्याला वैचारिक ज्ञानप्राप्ती झाली आणि एक दिवस हरळय्याचा मुलगा आणि मधुररसाची मुलगी शीलवंत आणि कलावती.चाभांराचा मुलगा आणि ब्राह्मणाची मुलगी हा मध्ययुगीन भारतातील पहिला आंतरजातीय विवाह महात्मा बसवेश्वरराने लावलेला आहे.
या क्रांतिकारी विचारांने तत्कालीन धर्मव्यवस्थेला व राजसत्तेला हादरून टाकले. आंतरजातीय विवाह महात्मा बसवेश्वरच्या पुढाकाराने बाराव्या शतकात घडवूनआला. मागास जातीतील संत हरळय्या यांचा मुलगा शीलवंत व मधुररस ब्राह्मण मंत्र्याची मुलगी कलावती यांच्यात घडवून आलेल्या विवाहाने समाजात हडकंप माजला. पण समाजातून सरसकट जातीव्यवस्था मोडीत काढायची असेल तर रोटी-बेटी व्यवहार झाले पाहिजेत. म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी विमलताई वैद्य या सुवर्णकार समाजाच्या मुलीशी लग्न करून जाती व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. तेच काम राज्यश्री शाहू महाराजांनी केले आपली चुलत बहीण आक्काराणी साहेब यांचा विवाह धनगरत समाजाच्या तुकोजी होळकरांसोबत करून दिला व धनगर व मराठा हे एकच आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला.तेच काम शिवरायांनी केले प्रतापराव गुजर जातिवंत मराठा नाहीत त्यांची एकुलती एक मुलगी जानकीचा विवाह राजारामाशी लावून दिला माझ्या शिवरायांनी कुळ पाहिलं नाही,गोञ पाहिलं नाही हुंडा मागितला नाही.शिवरायांनी जातीनिर्मुलनाच काम केलं.डाॕ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ,”मला जर मुलगी असती तर मी मातंग समाजाच्या मुलाला दिली असती”. तेच काम बसवेश्वरांनी केलेल आहे. चांभाराचा मुलगा ब्राह्मणाची मुलगी हे पहिलं लग्न लग्न लागल,लग्न पार पडलं लग्न पार पडल्यावर सहाजिकच आहे पोटतिडक उठते. हे लग्न म्हणजे इतकं खतरणाक आहे की तिथल्या लोकांच्या जिव्हारी झोंबल त्यामधला मंचन्ना पंडित आणि नारायण भट या दोघांनी बीज्जल राजाचे कान भरले, धर्म बुडतो आहे.प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळी महापुरुषांनी क्रांती करण्याचा प्रयत्न केला त्या त्या वेळी आगडोंब उसळलेला आहे.जसे जोतिबांनी शाळा उघडली की धर्म बुडाल्याची ब्राह्मणांनी आवई उठवली. अहो शुद्र कुठे शिकतात काय? राजर्षी शाहुमहाराज महाराजांना वेदोक्त प्रकरणात अधिकार नाकारले. तुकारामांनी वेदांवर भाष्य केले अभंग लिहिले म्हणून रामेश्वर भटानें अभंग गाथा इंद्रायणीमध्ये बुडवली. म्हणजे ज्या ज्या वेळी क्रांत्या घडलेल्या आहेत. त्या त्या वेळी धर्म बुडतो असा फार मोठा आगडोंब माजवला गेला.हा आगडोंब त्या काळात सुद्धा माजवला गेला आणि मग पुढे त्याचे परिणाम काय झाले बीज्जल राजाने हरळय्या, मधुररसाचे डोळे काढले हत्तीच्या पायी देऊन त्यांची कत्तल केली. आणि हे खऱ्या अर्थाने बलिदान जातीव्यवस्था निर्मूलनासाठी बसवेश्वराच्या पुढाकाराने मनुवादी व्यवस्थेविरुद्ध मोठ्या प्रमाणावर केलेल बंड होत. जे धर्मात बसत नाही,जे वेदामध्ये बसत नाही अशावेळी या मनुवादीअवलादीना ठेचून काढण्यासाठी हा विवाह लावला होता.रोष होता, माहीत होतं की आता आपल्याला कदाचित हद्दपार व्हाव लागेल. घाबरले नाहीत. कारण बशेश्वर पळपुटे नव्हते घाबरणारे नव्हते. बीज्जल राजाच्या दरबारात हरळय्या, मधुररसाची कत्तल झाली.बसवेश्वराने मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांना हद्दपार करण्यात आलं आणि बसवेश्वरांचे तुकडे-तुकडे करून कुडल संगम मध्ये फेकले गेले आहेत. आजही तेच चालू आहे जे परिवर्तनाचं काम करतात त्यांच्या या देशात हत्या होतात पण म्हणून परिवर्तनाची लढाई थांबणार नाही अशा या समतेच्या पुजार्याला त्यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा करतो,

लेखक हे नांदेड जिल्ह्यात शिक्षक म्हणून काम करत आहे

लेखक- शंकर नामदेव गच्चे नांदेड मोबाईल नंबर-८२७५३९०४१०

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!