जालना जिल्हा

दस्त नोंदणीसाठी नागरिकांनी ई-सुविधांचा लाभ घ्यावा

images (60)
images (60)

न्यूज जालना दि. 8

सदस्थितीत राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढलेला आहे.या साठी राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विभागांने नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने व दस्त नोंदणीच्या सोईसाठी विभागात काही ऑनलाईन सेवा उपलब्ध आहेत. सदर सेवाचा नागरिकांनी वापर करुन दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी कमी करण्याच्या उदेशाने खालील सेवा व सुविधांचा वापर करण्याचे अनिवार्य केले असुन त्याचा वापर करुन दस्त नोंदणी बाबत शासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

नागरिकांना या विभागाच्या संकेतस्थाळावर असलेल्या दस्त नोंदणी करीता PDE द्वारे डाटा एंट्री करणे अनिवार्य करण्यात आलेले आहेत. यापुढे दुय्यम निबंधक काया्रलयातील डेटा एंट्री किंवा दुरुस्त्या पुर्णपणे थांबविण्यात येत आहेत.

नागरिकांनी सदर PDE डेटा एंट्री करुन दस्त नोंदणीसाठी या विभागाच्या वेबसाईटवर eStep-in या प्रणाली द्वारे दुय्यम निबंधक कार्यालयातील उपलब्ध असलेली सोईची वेळ ऑनलाईन आगाऊ बुक करुन किंवा कार्यालयीन दुरध्वनीवर समक्ष संपर्क साधुन वेळ आरक्षित करणे अनिवार्य करण्यात आले आहे.कोणत्याही परिस्थतीत आगाऊ वेळ आरक्षीत केली नसल्यास (walking) दस्त नोंदणी होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

नागरिकांनी दस्ताचे निष्पादन घरी किंवा कार्यालयाच्या बाहेरच करावे व प्रत्येक व्यक्तीने सह्यांसाठी स्वत.चे पेन आणणे ,एकच पेन एकमेकात सह्यांसाठी वापरु नये.आरक्षित वेळेलाच कार्यालयात हजर रहावे ,मास्क लावल्या शिवाय कोणत्याही व्यक्तीला कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही .यांची नोंद घ्यावी.
विभागाच्या वेबसाईट वर लिव्ह ॲड लायसन ई –रजिस्ट्रेशन प्रणालीचा पर्याय उपलब्ध असल्याने लिव्ह ॲड लायसन दस्ताची कार्यालयातील नोंदणी (फिजिकल रजिस्ट्रेशन) पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात येत आहे.

सदयस्थितीत दस्त
नोंदणीसाठी मोठ्या शहरात उदा.मुंबई, ठाणे, पुणे व इतर ठिकाणी सकाळ, दुपार दोन सत्रात कार्यालये सुरु आहेत.त्या ऐवजी अशा सर्व दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाची वेळ नियमित सत्रात म्हणजेच 9.45 ते 6.15 या वेळेत सुरु राहतील. याशिवाय जी दुय्यम निबंधक कार्यालये दस्त नोंदणीसाठी शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी सुरु होते त्याचे कामकाज शनिवार, रविवार बंद करण्यात येत असुन त्या कार्यालयांचे कामकाज सोमवार ते शुक्रवार पाच दिवस नियमित सुरू राहील.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!