कोरोना महामारीमुळे ग्रामीण भागातील छोटे व्यावसायिक सापडले अडचणीत
ब्रेक द चेन अंतर्गत अनेक छोटी दुकाने बंद; लॉकडाऊनचा फटका
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तुटावी म्हणून ग्रामीण भागात सतत लॉकडाऊन वाढत असल्याने चहा,पान टपरी, सायकल दुकाने,स्टेशनरी,चप्पल,संगणक केंद्रे,थंडपेय दुकाने, सलून,कापड दुकाने, मोबाईल,आदी ग्रामीण भागातील छोटे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.
दुकान गाळे भाड्याने घेऊन सुरू केलेल्या व्यवसायांवर उदरनिर्वाह करणारे आर्थिक संकटात आले आहेत.त्यामुळे यापुढे लॉकडाऊन करू नये,अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
दैनंदिन होणारा कौटुंबिक खर्च तर चुकत नाही परंतु येणारा इनकम लॉकडाऊनमुळे बंद पडला आहे.हे केव्हा पूर्वीसारखे सुरळीत होणार हे आत्ताच कोणीही सांगू शकत नाही.त्यामुळे छोट्या व्यवसायका पुढील अडचणी वरचेवर वाढत चालल्या आहेत.
“ज्या व्यवसायांवर रोजची रोटी चालते तो व्यवसाय वारंवार बंद ठेवावा लागत असल्याने अडचणीत भर पडली आहे.त्यामुळे शासनाकडून आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे”.
-भागवत गोरे
सलून व्यवसायिक कुंभार पिंपळगाव
” रोजच्या व्यवसायांतून घरखर्च भागत होता.परंतू गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारी व सततच्या लॉकडाऊनमुळे मुळे आर्थिक जिवन कोलमडले आहे.भाग भांडवल कसा उभा करावा असा प्रश्न सतावत आहे”.
-अमोल राठोड
केसूला झेरॉक्स अँड जनरल स्टोअर्स कुंभार पिंपळगाव