महाराष्ट्र न्यूज

गोरशिकवाडीचे संस्थापक अध्यक्ष काशीनाथ नायक अनंतात विलीन

बंजारा समाजाचा नायक काळाच्या पडद्याआड

images (60)
images (60)

न्यूज जालना ब्यूरो/कुलदीप पवार


बंजारा समाजाचे प्रबोधनकार,गोर सिकवाडीचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष काशीनाथजी नायक राठोड यांचा शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या निधनाने बंजारा समाजाची कधी भरून न निघणारी हानी झाली.मागील पंधरवड्यापासून नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.परंतु तब्येत अचानक खराब झाल्याने त्यांना हैदराबाद येथील अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले.अखेर शुक्रवारी सकाळी आठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.व अखेरचा श्वास घेतला.

बस आगारातील साधा मेकॅनिक ते समाजसुधारक अशी त्यांची ओळख होती.त्यांनी गोर सिकवाडी हि सामाजिक संघटना उभी करून समाजाला न्याय, हक्क,मान,सन्मान मिळावा म्हणून त्यांनी अहोरात्र खूप परीश्रम केले.बंजारात समाजात संत सेवालाल व धर्मगुरू डॉ रामराव महाराज यांच्या नंतर काशीनाथजी नायक यांचे समाजासाठी योगदान होते.त्यांच्या या निधनाने समाजात कधीही भरून न निघणारी हानी झालेली आहे.

काशीनाथजी नायक हे सुरूवातीला मेकॅनिक म्हणून काम करत होते.समाजाला काही देणे लागतो म्हणून त्यांनी संघटना वाढवून सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय या क्षेत्रामध्ये गोर बंजारा समाजाला न्याय मिळावा म्हणून कोणताही स्वार्थ न ठेवता नि:स्वार्थ पणे काम करून मांडलेली विचारसरणी घराघरांत पोहोचली.त्यांनी आपली नोकरी करूनही समाजाप्रती ध्येयवेडेपणा,जिद्द व चिकाटी च्या जोरावर त्यांनी जगभर प्रवास करून जगाच्या पाठीवर वास्तव्यास असणाऱ्या बंजारा समाजातील चाली, रूढी, परंपरा यांचा अभ्यास करुन त्यांनी सामाजिक चळवळ उभी केली ती म्हणजे गोर सिकवाडी….
फुले, शाहू, आंबेडकर,सतगरु सेवालाल महाराज या महापुरुषांच्या विचाराने ते प्रेरीत होते.आपल्या समाजातील दीन दलित शोषित यांच्या सर्वांगीण न्याय, हक्क अधिकार यासाठी ते शेवटपर्यंत लढले.

त्यांनी सुरू केलेल्या गोर सिकवाडी या चळवळीसाठी एक दोन नव्हे तर तब्बल दहा ते पंधरा माणसे स्व:तचे आयुष्य, आई-वडील,शासकीय नौकरी,भाऊबंद, नातेवाईक,सर्व सोडून समाजासाठी निश्वासार्थ त्याग करून त्यांनी दाखवून दिलेल्या समाजाच्या वेगळ्या वाटेवर चालण्याची प्रेरणा दिली.मागील 20 वर्षांपासून कधी न डगमगता,न थकता,प्रत्येक कार्यक्रमात हजर राहून समाजाला संबोधित केले. हे त्यांचा खास वैशिष्ट्य होते.कार्यक्रमात हारे तुरे,सत्कार न स्वीकारता खाली बसायचे.ना मोठेपणा ना बडेजाव पूर्ण आयुष्य समाजासाठी अर्पण करून कित्येक कार्यक्रम एका हाकेवर गोळा करून कोणाकडुन पैसा न घेता हाकेला साथ देणारी माणसे जोडली.एकदम साधी राहणी पण उच्च विचारसरणी चे व्यक्तिमत्तव म्हणजे काशीनाथजी नायक होते.

त्यांच्या अचानक जाण्याने समाजात कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे.यानंतर गोर सिकवाडी पुरस्कृत गोरसेना यांची जबाबदारी प्रामुख्याने प्रा.संदेश चव्हाण व त्यांच्या विचारांने प्रेरित झालेले तमाम अनुयायांनी हा वारसा जपायचा आहे.तरचं काशिनाथ नायकांनी पाहिलेल्या स्वप्नाची पराकाष्ठा करता येईल.त्यांचे कार्य येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरेल.

समाजासाठी त्यांनी उभी केलेल्या सामाजिक चळवळीला कायम ठेवत हमारा राज,हमारा तांडा या उक्तीप्रमाणे त्यांनी जर ही ज्योत कायम पिढ्यांनपिढ्या ठेवली तर खरच नायक यांनी पाहिलेल्या अधूरा स्वप्नाला नक्कीच यश मिळेल.तरच त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळेल. हीच सेवालाल चरणी प्रार्थना.सोपं नसतं निश्वासर्थपणे समाजासाठी काम करणारे विरोधकापेक्षा समाजातील दलाला सोबतच जास्त लढावं लागते.हे शब्द कायम स्मरणात राहील.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!