घनसावंगी तालुका
कुंभार पिंपळगाव येथील विहीरीत आढळला मृतदेह
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिपळगाव येथील भेंडाळा रोडवरील मीनाक्षी फायबर जिनिंग जवळ शेखलाल शेख चांद यांच्या शेतामधील विहिरीमध्ये रविवारी सकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली . घटनास्थळी पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक शिवसिंग बहुरे ,पोलीस हवालदार रामदास केंद्रे यांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर कपड्यावरून
मूर्ती येथील अशोक बाबासाहेब माळवदे रा मूर्ती( वय 30) याचे ते प्रेत असल्याचे नातेवाईकांनी ओळखले त्यानंतर त्या मूर्त्यदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून सायंकाळी मूर्ती गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यातआले याबाबत घनसावंगी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यु चा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी सांगितले आहे.