पारध बु.च्या जिल्हा परिषद शाळेत १० डिसेंबरला मोठा निर्णय!
शालेय व्यवस्थापन समितीची निवड होणार; पालकांच्या सूचनांसाठी ३० नोव्हेंबर अंतिम मुदत
NEWS JALNA
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य आणि शाळेच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या समितीचे पुनर्गठन; पालकांनी उपस्थित राहण्याचे मुख्याध्यापकांचे आवाहन
भोकरदन प्रतिनिधी| गणेशराव खिस्ते, (पिंपळगाव रेणुकाई)
भोकरदन तालुक्यातील पारध शाहूराजे बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आता नवीन शालेय व्यवस्थापन समिती निवडली जाणार आहे. विद्यमान समितीची मुदत १२ डिसेंबर २०२६ रोजी संपत असल्याने गुरुवार, दि. १० डिसेंबर रोजी नवीन समितीचे पुनर्गठन करण्यात येणार आहे. या निवडीकडे पालकांचे लक्ष लागले असून, शाळेच्या आगामी शैक्षणिक विकासाची दिशा ठरविण्यात या समितीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
शालेय व्यवस्थापन समिती ही केवळ नावापुरती समिती नसून शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणे, शाळेचा विकास आणि विविध शैक्षणिक उपक्रमांच्या अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे नवीन समितीमध्ये पालकांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे.
पालकांसाठी ३० नोव्हेंबर महत्त्वाचा; त्यानंतर हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत!
नवीन समितीच्या पुनर्गठनासंदर्भात पालकांना निमंत्रण पत्रिका १ डिसेंबर २०२६ रोजी संबंधित वर्गशिक्षकांमार्फत देण्यात येणार आहेत. समितीच्या निवडीबाबत पालकांना काही सूचना किंवा हरकती असल्यास त्या लेखी स्वरूपात ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत शाळेच्या कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. या मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या सूचना अथवा हरकतींचा विचार केला जाणार नसल्याचे शाळा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
१० डिसेंबरला पालकांची उपस्थिती महत्त्वाची!
शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नवीन शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन महत्त्वाचे असल्याने सर्व पालकांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे. तसेच वेळेत आपल्या सूचना व हरकती सादर करून १० डिसेंबर रोजी होणाऱ्या निवड प्रक्रियेस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पारध बु.चे मुख्याध्यापक रामेश्वर कि. हातकडके यांनी केले आहे.
न्यूज जालना YouTube व्हिडिओ
न्यूज जालना Facebook पेज

मोठी बातमी असल्यास इमेज लांब होऊ शकते. संपूर्ण मजकूर या इमेजमध्ये समाविष्ट केला आहे.