जालना जिल्हा

सामाजिक उपक्रम हिच महामानवांना आदरांजली : राजेश टोपे छत्रपती फाऊडेशनतर्फे 82 युवकांचे रक्तदान

जालना (प्रतिनिधी) : देशभरासह महाराष्ट्रामध्ये करोनाने थैमान घातले असून यामुळे रक्ताचा तुटवडा भासू नये याकरिता महामानवांच्या जयंतीचे औचित्य साधून सुरु केलेला रक्तदानाचा उपक्रम हा जीवनदायी असून असेच सामाजिक उपक्रम राबविणे हीच महामानवांना खरी आदरांजली ठरेल. असे प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे बोलतांना केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातील मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आ. कैलास गोरंट्याल, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधिर खिरडकर, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, भारिपचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. बी. एम. साळवे, एकबाल पाशा, रिपाई नेते अ‍ॅड. शिवाजीराव आदमाने, सुधाकरराव रत्नपारखे, भिमशक्ती सामाजिक संघटनेचे सुधाकर निकाळजे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेश राऊत, सुनिल खैरे, नगरसेवक अरूण मगरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, रक्तदानाचा राबविलेला उपक्रम हा अभिमानास्पद असून सद्यस्थितीत अशा उपक्रमांची समाजाला नितांत गरज आहे. महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथीचे औचित्य साधून इतरांनीही असे उपक्रम राबवावेत. असे आवाहनही श्री टोपे यांनी यावेळी केले. छत्रपती फाऊंडेशनतर्फे आयोजीत शिबीरात 82 युवकांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक तथा छत्रपती फाऊंडेशनचे प्रमुख सुनिल रत्नपारखे यांनी रक्तदाना सारखा उपयुक्त उपक्रम आयोजीत केल्याबद्दल श्री टोपे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी कार्यक्रमास नगरसेवक विजय पवार, आमेर पाशा, जयंत भोसले, महेश निक्कम, अ‍ॅड. अशपाक पठाण, संदीप खरात, राहुल आदमाने यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचलन प्रशांत खरात यांनी तर आभार रवि खरात यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छत्रपती फाऊंडेशनचे पदाधिकारी निरंत पट्टेबहाद्दुर, अमोल राऊत, गणेश इंगळे, दिपक शिंदे, विशाल रत्नपारखे, दिपक खरात, राज रत्नपारखे, रंजित रत्नपारखे, सिद्धार्थ कनकुटे आदींनी परिश्रम घेतले.

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!