0 ते 18 वयोगटातील सर्व प्रकारच्या बालकांना जिल्ह्यातील आरबीएसके टिममार्फत तपासणी करून मोफत शस्त्रक्रिया- पालकमंत्री टोपे
13 बालकांच्या अतिजोखमीच्या शस्त्रक्रिया मोफत
जालना दि.15 (न्यूज जालना) :- राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या उपक्रमातुन नवजीवन राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम तथा डिस्ट्रीक्ट अली इंटरव्हेशन सेटर (डिईआयसी) जिल्हा रुग्णालय ,जालना यांच्या माध्यमातुन 0 ते 18 वयोगटातील सर्व प्रकारच्या बालकांना जिल्ह्यातील आरबीएसके टिममार्फत तपासणी होऊन त्या बालकास काही विकासात्मक अथवा सर्जिकल तसेच विकासात्मक अथवा सर्जिकल समस्या असेल तर बाहेरील रुग्णालयातुन मोफत उपचार देण्यात येऊन यात सर्जिकल तसेच विकासात्मक उणिवा दुर करुन अपंगत्व कमी करण्यात येतात. परंतु ही प्रक्रीया कोरोना महामारीमुळे अत्यंत संथगतीने सुरु असल्याचे लक्षात येताच राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी पुढाकार घेत प्रलंबित असलेल्या शस्त्रक्रिया तातडीने करण्याबरोबरच शिबीराचे आयोजन करुन बालकांची तपासणी करण्याचे निर्देश दिले.
त्यानुसार पालकमंत्री यांचे विशेष कार्याधिकारी डॉ. सचिन जाधव यांनी सर्व संबंधीत रुग्णालयाशी समन्वय साधला व संबंधीत ह्दय शस्त्रक्रिया करण्यासाठी 2 डि एको शिबीर आयोजित करत या शिबीरामध्ये 11 मुलांना अतिजोखमीच्या ह्दय शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे निदान झाले. या मुलांच्या शस्त्रक्रिया नामांकित हॉस्पीटलमधुन करुन घेण्यासाठी पालकमंत्री राजेश टोपे यांनी निर्देश दिल्याने जिल्ह्यातील 13 बालकांच्या अतिजोखमीच्या हृदयशस्त्रक्रिया कोकिळाबेन हॉस्पीटल मुंबई, श्री सत्यसाई संजिवनी हॉस्पीटल, खारघर, मुंबई व एम.जी.एम. हॉस्पीटल, औंरगाबाद अशा ठिकाणी मोफत करण्याबरोबरच 6 बालकांच्या कर्णदोषाशी संबंधीत Conchlar Implant ह्या अत्यंत महत्त्वाच्या शस्त्रक्रियादेखील मोफत करण्यात आल्या. यापैकी 3 शस्त्रक्रिया कोकिळाबेन हॉस्पीटल, मुंबई व 3 शस्त्रक्रिया यशश्री इ एन टी हॉस्पीटल, मिरज जि. सांगली या ठिकाणी मोफत करण्यात आल्या.
या शस्त्रक्रिया करण्यासाठी खाजगी रुग्णालयाचे दर हे प्रतिशस्त्रक्रिया 8 लक्ष 20 हजार इतकी असते. परंतु या सर्व शस्त्रक्रिया बालकांसाठी पुर्णत: मोफत करण्यात आल्या. पालकमंत्री राजेश टोपे यांच्या अथक प्रयत्न व आग्रही धोरण तथा सुचक मार्गदर्शनामुळेच या शस्त्रक्रिया पुर्ण होऊ शकल्या.
यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. पद्मजा सराफ, बालरोग तज्ञ डॉ. संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग तज्ञ डॉ. अर्चना खंडागळे, डिईआयसी मॅनेजर डॉ. मिनल देवले, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक विद्या एच म्हस्के,राजू खिल्लारे, संदीप रगडे, दिपक जाधव, अरुन सुर्वे, तेजस्वीनी वाघमारे व डॉ. पंकज शिंदे, डॉ. अमित जैस्वाल तसेच संपुर्ण आरबीएसके व डिईआयसी यांनी काम पाहिले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.