विरेगव्हाण तांड्यात बदलत्या वातावरणामुळे रुग्ण संख्येत वाढ;आरोग्यावर विपरीत परिणाम
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण तांडा येथे मागील काही दिवसांपासून बदलत्या वातावरणामुळे रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.वाढत्या उन्हाच्या काळात अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.वातावरणात गारवा तयार झाल्याने याचा परिणाम जन आरोग्यावर झाले आहे.अनेकांना सर्दी,ताप, खोकला, डोकेदुखी, टायफॉइड,न्यूमोनिया आदी आजार बळावत आहे.यामध्ये लहान मुले व वृद्धांचे प्रमाण अधिक आहे.
त्यामुळे शासकीय रूग्णालयासह खासगी दवाखाने देखील फुल्ल दिसून येत आहे.रूग्णसंख्या वाढत असली तरी ग्रामपंचायतीकडून स्वच्छता व धूरफवारणी मोहिमेकडे दुर्लक्ष केले जात आहे.याबाबत प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याचे दिसून येते.गावात डासांची उत्पत्ती होत असल्यामुळे घराघरातील नागरिक आजारी पडत आहे.ही बाब पाहता ग्रामपंचायतीने स्वछता व धूरफवारणी मोहिम राबविण्यात यावी,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
‘वातावरणातील बदलांमुळे सर्दी,खोकल्यासह इतर आजारांचेही रूग्ण वाढत आहेत.त्यामुळे नागरिकांनी घरगुती उपचार न करता तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावेत’.
डॉ.दिपाली राठोड
वैद्यकीय अधिकारी कुंभार पिंपळगाव
‘याबाबत येथील ग्रामसेवक शहाणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही.