कोरोना अपडेटजालना जिल्हा

जालना जिल्ह्यात कोरोना योद्ध्यांच्या मानधन मध्ये दुजाभाव.?

जालना जिल्ह्यात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे आणि त्यासाठी आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी दिवसरात्र एक करून काम करत आहे मात्र हे काम करत असताना वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये दुजाभाव करत आहे.

आयुक्त राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य यांचे आदेश आहेत की मानधन कोणत्याही परिस्थितीत एक तारखेला झाले पाहिजे तरीही जिल्हा स्तरीय अधिकारी याला जुमानत नाहीत जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचाऱ्यांचे मानधन नेहमीच वेळेवर जमा करतात आणि यामध्ये मानधन जमा करणारे अधिकारी स्वतःचे मानधन सुद्धा जमा करून घेतात परंतु जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय तसेच महिला रुग्णालय या अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन दर महिन्याला वीस ते पंचवीस दिवस उशिराने जमा होत असते आणि याला थातूरमातूर कारण पुढे करून कोरोना मध्ये सी सी सी,डी सी एच सी,कोविडं हॉस्पिटल असो सगळ्या ठिकाणी मदार ही कंत्राटी कर्मचारी यांच्यावरच आहे कोविड मध्ये जवळपास सत्तर टक्के हे कंत्राटी कर्मचारीच काम करत आहेत
एवढे असून सुद्धा ह्या कर्मचाऱ्याची आर्थिक अडवणूक केली जाते आणि हे नेहमीच असे केले जाते त्यामुळे कंत्राटी कर्मचा-यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे कारण ज्या लोकांचे मानधन वेळेवर जमा होतात ते कर्मचारी एसी मध्ये बसून काम करतात आणि जे कर्मचारी प्रत्यक्ष रुग्णांना सेवा देतात त्या कर्मचाऱ्यांना मानधनासाठी दर महिन्याला 20 ते 25 दिवस वाट पाहावी लागते कोरोना काळात सेवा देऊन सुद्धा अशी परिस्थिती असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठ्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते आणि ह्या गोष्टी समोर ठेवून जिल्ह्याचे आरोग्य मंत्री असलेले माननीय नामदार राजेश भैय्या टोपे यांच्याकडे सुद्धा लेखी तक्रार करून तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे सुद्धा लेखी तक्रार करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे देण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!