कुंभार पिंपळगावात रस्त्यावर नागरीकांचा मुक्तसंचार
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
कुंभार पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत कोरोना बाधित रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कुंभार पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत २७४ सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत. कुंभार पिंपळगाव सह ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने त्याचा प्रसार अधिक वेगाने वाढत आहे.
ग्रामीण भागात कोरोनाची होणारी वाढ ही आरोग्य विभागासाठी चिंतेची बाब ठरत आहे.
कुंभार पिंपळगाव सह परीसरात रूग्ण संख्या वाढत असुनसुद्धा तरीदेखील काही नागरिक बेजबाबदार पणे वागत आहेत.अत्यावश्क कामांचे प्रयोजन दाखवून पोलिसांना चकवा देत विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळत आहे.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात काही दिवसांसाठी संचारबंदी लागूच करण्यात आली असून, अत्यावश्यक सेवा दवाखाने व मेडीकल वगळता सर्व आस्थापने दुपारी वाजेच्या नंतर पूर्णपणे बंद राहणार आहेत.मात्र कुंभार पिंपळगावात संचारबंदीचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे.कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असून, नागरीक फारसे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.कुंभार पिंपळगाव बाजारपेठेतील व्यापारी घरी व ग्राहक मात्र दुकानाच्या दारी येत असल्याने विनाकारण गर्दी होत आहे.त्यामुळे व्यापारी वर्गातून संताप व्यक्त केले जात आहे.किराणा दुकान ,कृषी सेवा केंद्र व भाजीपाला या दुकानावर व्यापारी व ग्राहकांकडून नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे.बेजबाबदार नागरीक तोंडावर मास्क न लावताच विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसून येत असल्यामुळे अशा नागरीकांवर कठोर कारवाईची बडगा उगारण्याची मागणी होत आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व विनाकारण रस्त्यावर गर्दी करीत फिरणाऱ्या नागरीकांवर कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
‘ राज्यात पुढील काही दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून, दुपारी बारा वाजेच्या नंतर बाजारपेठ कडकडीत बंद राहणार आहे.दुकाने उघडी ठेवल्यास नियम मोडणाऱ्या व्यक्तींविरूद्ध कारवाई करण्यात येईल.व त्यांना कारवाईस सामोरे जावे लागेल’.
शिवसिंग बहूरे
पोलिस उपनिरीक्षक कुंभार पिंपळगाव