अंबड तालुका

अंबड येथे मोफत शिवभोजन योजने मुळे अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य

गरजवंताच्या चेहऱ्यावर आनंदाचेहास्य

अनिल भालेकर/अंबड

images (60)
images (60)

कोरोना महामारी ची दुसरी लाट आपला प्रभाव मोठ्या प्रमाणात दाखवत असून ग्रामीण भागासह शहरी भागातील अनेकांना आपल्या मगरमिठीत घेत असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या वर उपाय बंदी म्हणून संपूर्ण लॉक डाऊन न लावता संचारबंदी ची घोषणा केली. याकाळात दुर्बल घटकांन सह लहान व्यवसायिकांची तसेच रोजगारावर अवलंबून असणाऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून अनेक सवलती जाहीर केल्या. त्यातीलच एक महत्त्वाची घोषणा म्हणजे मोफत शिव भोजन ही एक आहे.
अंबड शहरात पाचोड नाक्यावर गोपी घायाळ यांच्या नियोजनबद्ध व्यवस्थापनात मोफत शिव भोजन योजना सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यापासून 75 व्यक्तींना दर्जेदार शिवभोजन वाटप केले जात आहे. याचा निश्चितच फायदा दुर्बल घटकातील व्यक्तींसह, महिला, बालके, अत्यावश्यक सेवेची वाहतूक करणारे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे संचार बंदी असल्यामुळे जीवनावश्यक सेवेचा व्यवसाय वगळता इतर सर्व व्यवसायांना बंदी असल्यामुळे या काळात लहान व्यावसायिकांसह मोलमजुरी करणाऱ्या व्यक्तींची उपासमार होऊ नये म्हणून गोपी घायाळ यांच्या देखरेख व उत्कृष्ट नियोजनात मोफत शिव भोजन वाटप सुरळीत सुरू आहे. वाटप ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सशीगचे नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत. तसेच जेवनाच्या पदार्थाचा दर्जा ही उत्तम असून या संचारबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात या सेवेचा लाभ घेत असल्याचे चित्र अंबड शहरात दिसून येत आहे. मोफत शिवभोजन मिळत असल्यामुळे अनेक गरजवंताच्या चेहऱ्यावर आनंदाचेहास्य उमटत असल्याचे पहावयास मिळत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!