कोरोना अपडेटजालना जिल्हा

जालना जिल्ह्यातील लॉकडाउन बाबत जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश

अत्‍यावश्‍यकसेवेमध्‍ये समाविष्‍ठ असलेल्‍या सेवा आणिआस्‍थापना यांना सूट देण्‍यात आलेल्‍या वेळे मध्‍ये बदल

अत्‍यावश्‍यक सेवेमध्‍ये समाविष्‍ठ असलेल्‍या सेवा आणि

images (60)
images (60)

आस्‍थापना यांना सूट देण्‍यात आलेल्‍या वेळे मध्‍ये बदल

जालना दि.18- कोविड – 19 च्‍या प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांचे अनुषंगाने दिनांक 01 मे 2021 रोजीच्‍या सकाळी 7.00 वाजे पर्यंत करावयाच्‍या कार्यवाही दिनांक 14 एप्रिल 2021 रोजीच्‍या आदेशानुसार संचारबंदी लागु करण्‍यात आली आहे. ती बाब पुन:श्‍च उदधृत करण्‍यात येत आहे.

नागरीकांना या आदेशान्‍वये देण्‍यात आलेल्‍या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे व संबंधित यंत्रणांना सदर मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करणे सुलभ होण्‍यासाठी उक्‍त नमुद आदेशान्‍वये देण्‍यात आलेल्‍या मार्गदर्शक सुचनांमधील बाबी / मुद्दे संक्षिप्‍तस्‍वरुपात खालील तक्‍यात एकत्रितपणे नमुद करण्‍यात येत आहेत. या आदेशातील नमुद करण्‍यात आलेल्‍या अत्‍यावश्‍यक सेवेमध्‍ये समाविष्‍ठ असलेल्‍या सेवा आणि आस्‍थापना यांना सूट देण्‍यात आलेल्‍या वेळे मध्‍ये खालीलप्रमाणे बदल करण्‍यात येत असुन खाली नमुद केल्‍याप्रमाणे वेळ अमलात राहील. हा आदेश जालना जिल्‍हयासाठी लागु राहतील.

अ.क्र.

विषय

सुरु ठेवण्‍याची कालमर्यादा

1.

संचारबंदी

1.1

नागरीकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरणे

अत्‍यावश्‍यक कारण / अत्‍यावश्‍यक सेवेशिवाय नागरीकांना घराबाहेर पडण्‍यास मनाई राहील.

1.2

अत्‍यावश्‍यक सेवादेणारे अधिकारी / कर्मचारी, आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाशी संबंधित असणारे अधिकारी / कर्मचारी

ओळखपत्रासह संचार करण्‍यास परवानगी (24 तास)

1.3

संचारबंदी मधुन रुग्‍णालय, रोगनिदान केंद्र, चिकित्‍सालय, लसिकरण केंद्र, वैदयकिय विमा कार्यालय, औषध दुकाने, औषधी निर्मिती उदयोग इतर वैदयकीय आणि आरोग्‍य सेवा यांचा त्‍यांना आवश्‍यक अशा अनुषगीक उत्‍पादन आणि वितरण तसेच वितरक, वाहतुक आणि पुरवठा साखळी यांचा देखील समावेश असेल. लस, निर्जतुंके, मास्‍क, वैदयकीय उपकरणे, त्‍यांना सहाय्यभुत कच्‍चा माल उदयोग आणि अनुषंगिक सेवा यांचे उत्‍पादन व वितरण यांचा देखील समावेश असेल

पुर्ण वेळ : (24 तास)

1.4

कोविड चाचणी : लसिकरण

पुर्ण वेळ : (24 तास)

1.5

पशुवैदय‍कीय दवाखाने, पाळीव प्राणी संगोपन केंद्र, पाळीव प्राणी, पशुखादयाची दुकाने, Pet Shop, कृषी संबंधित सेवा – बियाणे, खते, अवजारे व त्‍यांची दुरुस्‍ती इत्‍यादी

सकाळी 7.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत

1.6

अत्‍यावश्‍यक सेवा देणारी दुकाने (किराणा, भाजीपाला, फळे, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, खादयपदार्थाची दुकाने – पार्सल सेवा, चिकन, मटन, अंडी, मासे, पोल्‍ट्री दुकाने)

सकाळी 7.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत

गॅस सिलींडर पुरवठा

पुर्णवेळ

1.7

भाजीमंडई

सकाळी 7.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत

1.8

ऑप्‍टीकल्‍स – चष्‍मादुकाने

सकाळी 7.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत

2.

शासकीय कार्यालये

2.1

आरोग्यसेवा, वीज, पाणी, बॅंकीग, वित्‍तीय सेवा, आपत्‍ती व्‍यवस्‍थापन

100 % उपस्थिती (ओळखपत्र लावणे अनिवार्य)

2.2

स्‍थानिक प्राधिकरणाच्‍या अत्‍यावश्‍यक सेवा

पुर्णवेळ : (24 तास)

2.3

इतर शासकीय कार्यालये

50 % उपस्थिती (कोविड – 19 च्‍या प्रतिबंधात्‍मक उपाययोजनासांठी चालु ठेवायचे असल्‍यास शासकीय विभागांचे / कार्यालयांचे प्रमुख (HOD)यांचे निर्णयानुसार 100 % क्षमतेने सुरु – ओळखपत्र अनिवार्य)

2.4

शासकीय बैठका

ऑनलाईन पध्‍दतीने

2.5

शासकीय कार्यालयामध्‍ये विनापरवानगी (Walking) अभ्‍यागतांना प्रवेश (पोलीस स्‍टेशन वगळता)

प्रवेश बंदी

2.6

शासकीय कार्यालयात कार्यालयप्रमुखाची पुर्वपरवानगी घेऊन भेट देणारा अभ्‍यागत

भेट देण्‍यापुर्वी 48 तासांच्‍या आत RTPCR/RAT/TruNAT/ CBNAAT Test चाचणी निगेटिव्‍ह असेल तरच प्रवेश

3

निमसरकारी – खाजगी कार्यालये

3.1

बॅंका, विजवितरण कंपनी, टेलिकॉम कंपन्‍या, औषधी वितरण, उत्‍पादन कार्यालये,

पुर्णवेळ : (24 तास)

3.2

परवानगी दिलेले कार्यालय वगळता इतर सर्व खाजगी कार्यालये

बंद

3.3

SEBI व SEBI अंतर्गत मार्केट इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर्स संस्‍था उदा. स्‍टॉक एक्‍सचेंजेस, गुंतवणुक व क्लिअरिंग कार्पोरेशन्‍स, SEBI अंतर्गत नोंदणीकृत संस्‍था, RBI अंतर्गत नोंदणीकृत व मध्‍यवर्ती संस्‍था उदा. स्‍वतंत्र प्रा‍थमिक डिलर्स, CCIL, NPCL, पेमेंट सिस्‍टीम ऑपरेटर्स, फायनान्शिअल मार्केट, सर्व प्रकारचे Non-Banking वित्‍तीय संस्‍था, सर्व सुक्ष्‍म वित्‍तीय संस्‍था, CA, वकीलांची कार्यालये, कस्‍टम हाऊस एजंट/लसीकरणाशी संबंधित परवानाधारक मल्‍टी मोडल ट्रान्‍सपोर्ट ऑपरेटर

सकाळी 7.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत

3.4

बोर्ड, विद्यापीठ किंवा प्राधिकरण यांची परीक्षा घेण्‍यासाठी जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाची परवानगी घेऊन परीक्षार्थी व परीक्षेसाठी नियुक्‍ती असणारे अधिकारी / कर्मचारी

सूट (सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत)

4

अत्‍यावश्‍यक सेवा

4.1

रेल्‍वे, टॅक्‍सी, ऑटो, सार्वजनिक बस सेवा, स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेची मान्‍सून पूर्व कामे, मालवाहतूक, स्‍थानिक प्राधिकरणांच्‍या सार्वजनिक सेवा, मान्‍यताप्राप्‍त मिडीया

पूर्ण वेळेः (24 तास)

4.2

बस, रेल्‍वे, विमान यांद्वारे प्रवास करणा-या प्रवाशांना घरापासून बसस्‍थानक, रेल्‍वे स्‍थानक, विमानतळापर्यंत व तेथून घरापर्यंत जाण्‍यासाठी परवानगी

वैध टिकीटाचे आधारे परवानगी राहील

4.3

उद्योगांमध्‍ये काम करणारे कामगार यांना कामावर जाण्‍यासाठीची परवानगी

वैध ओळखपत्राचे आधारे परवानगी राहिल. (10%व्‍यवस्‍थापकीय कर्मचारी), ओळखपत्र आवश्‍यक

4.4

दुकाने, बाजारपेठ, मॉल्‍स (अत्‍यावश्‍यक सेवा देणारी दुकाने वगळून)

बंद राहतील

4.5

आठवडी बाजार

बंद राहतील

4.6

पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्‍पादन, कार्गो सेवा, डाटा सेंटर्स/क्‍लाउड सर्व्हिस पुरवठादार/माहिती व तंत्रज्ञान सेवेशी संबंधित सेवा, शासकीय/खाजगी सुरक्षा सेवा, गॅरेजेस, टायर पंक्‍चर दुकाने, दूरसंचार सेवा सुरळित राहण्‍यासाठी आवश्‍यक असलेल्‍या बाब/सेवा

अत्‍यावश्‍यक सेवेसाठी पूर्ण वेळः 24 तास

नागरीकांसाठीः सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत

5

वाहतूक व्‍यवस्‍था

5.1

ऑटोरिक्षा

पूर्ण वेळः (24 तास) – चालक व 2 प्रवासी फक्‍त (Driver + 2 Passengers only),

नियमांचा भंग केल्‍यास दंड रु. 500/-

5.2

टॅक्‍सी/कॅब

पूर्ण वेळः (24तास) – चालक व परिवहन नियमानुसार अनुज्ञेय क्षमतेच्‍या 50%वाहन क्षमता(Driver + 50% Vehicle Capacity as per RTO)नियमांचा भंग केल्‍यास प्रवाशी व चालक प्रत्‍येकी दंड रु. 500/-

5.3

सार्वजनिक बस सेवा

पूर्ण वेळः (24 तास) परिवहन विभागाच्‍या मान्‍यतेनुसार पुर्ण आसन क्षमतेने परवानगी आहे. परंतु प्रवाशांना उभे राहुन प्रवास करण्‍यास मनाई राहील.

5.4

रेल्‍वे

पुर्ण वेळः (24 तास)- विना मास्‍क व उभे राहुन प्रवास करण्‍यास मनाई राहील. नियमाचा भंग केल्‍यास दंड रु. 500/-

5.5

खाजगी वाहने, खाजगी बसेस

अत्‍यावश्‍यक सेवेसाठी, आपत्‍कालीन सेवेसाठी तसेच या आदेशात नमुद केलेल्‍या कारणांसाठी

6

बांधकाम व उत्‍पादन क्षेत्र

6.1

बांधकामाच्‍या ठिकाणी मजूरांना राहणयची सोय असल्‍यास असे बांधकाम तसेच बांधकाम/ विकास कामांकरीता लागणारी सामग्री ने-आण करणे,

पूर्ण वेळः (24 तास)

नियमाचा भंग केल्‍यास सदर व्‍यवसायीकास 10000/- रु. दंड

6.2

उत्‍पादन करणारे उदयोग आस्‍थापना/ कंपन्‍या/घटक

पूर्ण वेळः (24 तास)

6.3

ऑक्सिजन उत्‍पादन/जिवरक्षकऔषधे/औषधी उत्‍पादने

पूर्ण वेळ सुरु

7

रेस्‍टॉरंट, बार,हॉटेल्‍स/खादयपदार्थ विक्रेते

7.1

रेस्‍टॉरंट, बार,हॉटेल्‍स

केवळ घरपोच सेवा (Home Delivery)देण्‍यास परवानगी सकाळी 7.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत

नियमाचा भंग केल्‍यास दंड रु. 1000/- व संबंधीत आस्‍थापनेला रुपये 10000/- दंड

7.2

रस्‍त्‍याच्‍या कडेला खादयपदार्थांची विक्री करणारे विक्रेते

फक्‍त पार्सल सुविधा व होम डिलीव्‍हरी सुविधा – सकाळी 7.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत

नियमाचे उल्‍लंघन करणा-यास 500/- रु. दंड व संबंधीत विक्रेत्‍यास रु. 500/- दंड व संबंधीत दुकान कोवीड-१९ संपेर्यंत बंद

8

वृत्‍तपत्रे

8.1

शासन मान्‍य यादीवरील वृत्‍तपत्रे, उपगृह वाहीनीवरुन प्रसारीत होणारे चॅनल्‍स, अधिस्विकृतीधारक (Accreditation)पत्रकार

पूर्ण वेळः (24 तास)

8.2

वितरण

सकाळी 7.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत

8.3

छपाई

पूर्ण वेळः (24 तास)

9

करमणूक व मनोरंजन

9.1

चित्रपट गृहे, सिनेमा हॉल्‍स, नाटयगृहे व सभागृहे, मनोरंजन केंद्रे (Amusement Parks) / Arcades / व्‍हीडीओ गेम सेंटर्स, वॉटर पार्कस् (Water Parks),क्‍लब्‍सजलतरण तलाव, व्‍यायाम शाळा (Gyms), स्‍पोर्ट कॉम्‍प्‍लेक्‍स

बंद राहतील

9.2

मोकळया जागावरील उपक्रम, मनोरंजन पार्क , प्रेक्षागृहे, बगीचे/उदयाने, सार्वजनिक मैदाने,खेळाची मैदाने, क्रिडांगणे, स्‍पोर्टस क्‍लॉम्‍प्लेक्‍स, योगा क्‍लासेस,जिम, व्‍यायामशाळा, जलतरण तलाव

बंद राहतील.

10

धार्मीक व सामाजीक बाबी

10.1

धार्मिक स्‍थळे / प्रार्थाना स्‍थळे ( नियमीत अर्चक यांना पुजा करण्‍याची सुट राहील)

बंदः फक्‍त पुजारी इमाम,पाद्री धर्मगुरु भंते,इ. नियमीत पुजा अर्चा सुरु

10.2

धार्मिक / सामाजीक / राजकीय/ सांस्‍कृतीक कार्यक्रम

बंद

10.3

मुस्‍लीम बांधवाचा रमजानचा महिना लक्षात घेवुन दूध व फळे यांच्‍याशी संबधीत दुकाने

सकाळी 7.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यत तसेच

सायं. 5.00 ते 8.00 वाजेपर्यत

10.4

लग्‍न समारंभ 25 लोकांच्‍या उपस्थितीत संबंधित स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेची (न.प./न.पं./ग्रा.पं)पुर्वपरवानगी घेवून

संबधित Incident Commander तथा तहसिलदार यांची परवानगी घेतली असल्‍यास (सकाळी 7.00 ते रात्री 8.00 पर्यंत)

10.5

अंत्‍यविधी कार्यक्रम केवळ 20 लोकांच्‍या उपस्थितीमध्‍ये

पुर्ण वेळ

11

शाळा / महाविद्यालय / कोचिंग

11.1

शाळा ,महाविद्यालय

बंद

11.2

शाळा, महाविद्यालय केवळ इयत्‍ता 10 व 12 च्‍या परीक्षेकरीता विद्यार्थी व परीक्षेसंबंधीत स्‍टाफ यांना परीक्षेकामी ये-जा करणे

सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत

11.3

कोचींग क्‍लासेस, खाजगी शिकवण्‍या

बंद

11.4

विद्यार्थ्‍यांना परीक्षेकरीता प्रत्‍येक्षपणे संबंधित परीक्षा केंद्रावर प्रत्‍यक्ष उपस्थित राहणे व तेथून घरी जाणे

वैध प्रवेशपत्राचे आधारे परवानगी राहील.

12

इतर बाबी

12.1

केश कर्तनालय/स्‍पा/सलून/ब्‍युटी पार्लर

बंद

12.2

ई-कॉमर्स (अत्‍यावश्‍यक सेवेकरीता)

पुर्णवेळ(ओळखपत्र बाळगणे अनिवार्य)

12.3

कोणत्‍याही सहकारी गृह निमार्ण संस्‍थेत एका वेळी पाच कोरोना सकारात्‍मक अहवाल आलेल्‍या व्‍यक्‍ती आढळल्‍यास सदर सहकारी गृहनिमार्ण संस्‍था सुक्षम प्रतिबंधात्‍मक क्षेत्र म्‍हणुन घोषीत केले जाईल.

अशा सुक्षम प्रतिबंधात्‍मक क्षेत्रामध्‍ये अभ्‍यागतांना प्रवेश बंद असेल. नियमांचे भंग झाल्‍यास रुपये 10000/- दंड

12.4

घरगुती मदतनीस/वाहन चालक/स्‍वयंपाकी

संबंधीत स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेची (न.प./न.पं/ग्रा.पं) पुर्वपरवानगी घेवून Incident Commander तथा तहसिलदार यांनी परवानगी दिल्‍यास सुट

टिपः- ज्‍या खाजगी कार्यालये/हॉटेल्‍स/किराणा दुकाने/औषधी दुकाने/पेट्रोल पंप/गॅरेजेस/इत्‍यादींना ज्‍या कालावधीसाठी चालु ठेवण्‍याची परवानगी दिलेली आहे तेथे काम करणा-या व्‍यक्‍तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्‍या नियमनुसार तात्‍काळ लसीकरण (Vaccination) करुन घेणे गरजेचे आहे. अथवा त्यांनी दि. 14 एप्रिल 2021 पासून सोबत RTPCR/RAT/TruNAT/CBNAAT Test चे निगेटीव्‍ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहिल. त्‍या अहवालाची (टेस्‍ट रिपोर्ट) वैधता 15 दिवस राहिल.

सदर आदेशाचे उल्‍लंघन करणारी व्‍यक्‍ती आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहिता 1860 (45) च्‍या कलम 188, आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतूदीप्रमाणे फौजदारी कार्यवाहीस पात्र राहील.

सदर आदेशाची अंमलबजावणी दिनांक 18एप्रिल 2021 रोजी रात्री 8.00 वाजेपासून तात्‍काळ लागु करण्‍यात येत असून सदर आदेश दिनांक 01 मे 2021 रोजीचे सकाळी 7.00 वाजेपर्यंत लागु राहील. तसेच केंद्र शासनाचे, राज्‍य शासनाचे व या कार्यालयाने या पुर्वी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश लागु राहतील. असेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!