श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथील यात्रोत्सव यंदा कोरोना महामारी मुळे रद्द
कुंभार पिंपळगाव /कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथे दरवर्षी गुडीपाडवा ते रामनवमी पर्यंत समर्थ रामदास स्वामी यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. दरवर्षी साजरा होणारा श्रीराम व श्री समर्थ रामदास स्वामी जन्मोत्सव सोहळा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. फक्त सकाळी पुजाऱ्याच्या हस्ते दोन्ही मंदिरात विधिवत पूजा होईल.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जमावबंदी असल्याने जन्मोत्सव व यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या पाच शतकांची असलेली परंपरा राम जन्मोत्सव मागील 87 वर्षांपासून साजरा करण्यात येत होता. परंतु या वर्षीचा समर्थ रामदास स्वामी यांचा जन्मोत्सव सोहळा कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आला आहे. परीसरातील नागरीकांनी विनाकारण गर्दी गर्दी करून नियमाचे उल्लंघन करू नये, व राम भक्तांनी आपल्या घरूनच श्रीराम व समर्थ रामदास स्वामी यांचे दर्शन घेऊन उत्सव साजरा करावा असे आवाहन श्रीराम मंदिर व समर्थ मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.