महाराष्ट्र न्यूज

धक्कादायक ; ऑक्सिजन गळतीने तब्बल २२ जणांचा मृत्यू

नाशिक – नाशिक येथे ऑक्सिजन गळती झाल्याने तब्बल २२ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली आहे.
ऑक्सिजनची तुटवडा भासत असतांना दुसरीकडे नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती (Oxygen Tank Leak) झाल्यानं ऑक्सिजन गळती दुर्घटनेत २२ रुग्ण दगावले आहेत अशी माहिती नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढवण्याची शक्यता आहे.
नाशिक च्या झाकीर हुसैन रुग्णालयात आज ऑक्सिजन टँक ची अचानक गळती झाल्याने रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 22 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली . येथील महानगरपालिकेच्या कोरोना रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने रुग्णांचे जीव टांगणीला आहे . या घटनेमुळे झाकीर हुसैन रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 22 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर आहेत . सुरुवातीला 11 जणांच्या मृत्यूचे वृत्त आले होते , अवघ्या काही मिनिटांत मृतांचा आकडा दुपटीने वाढला . डॉ . झाकीर हुसेन रुग्णालयात 13KL क्षमतेचा ऑक्सिजन टैंक लावण्यात आला आहे . हाच टँक बुधवारी लीक झाला . ऑक्सिजनच्या टॅकची दुरुस्ती करण्यात आली आहे.या रुग्णालयात ऑक्सिजनवर 131 रुग्ण आहेत . तर अत्यवस्थ रुग्ण 15 व्हेंटिलेटरवर आहेत . त्यांना इतर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे . 13 KL क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता . ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला आहे . या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला आहे.महापालिकेचे हे संपूर्ण कोविड रुग्णालय असून सुमारे दीडशे रुग्ण येथे दाखल आहेत.अनेक रुग्ण ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरवर आहेत . ऑक्सिजन टाकीला गळती लागल्याने अशा रुग्णांचा जीव धोक्यात आला असून त्यांना अन्य ऑक्सिजन असलेल्या रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात येत आहे . जिल्हा शासकीय रुग्णालयातून तातडीने 15 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी झाकीर हुसेन रुग्णालयात पाठविण्यात येत आहे .

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!