व्यापारी महासंघाकडून मास्क व सॅनिटाझरचे पत्रकारांना वाटप.
कुंभार पिंपळगांव व्यापारी महासंघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ घनसावंगी तालुका नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार
कुंभार पिंपळगांव/प्रतिनिधी.
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे व्यापारी महासंघाच्या वतीने शनिवारी (दिं.२४) महारष्ट्र राज्य पत्रकार संघ घनसावंगी तालुका नवनिर्वाचित कार्यकारणी तील पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानिमित्त व्यापारी महासंघाच्या वतीने मास्क व सेनिटाझरचे वाटप करण्यात आले.
यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर , नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष किशोर शिंदे, उपाध्यक्ष गणेश ओझा , संभाजी कांबळे, कार्याध्यक्ष कौतिक घुमरे, सल्लागार विष्णुदास आर्दड, राजकुमार वायदळ, अभिषेक दुकानदार, भागवत बोटे, नवनाथ मोगरे, अशोक ओवळे, बाळासाहेब व्यवहारे, अपंग सेलचे तालुकाध्यक्ष मोईन कुरेशी,
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय शेषराव कंटूले, सचिव अतुल बोकन, कार्याध्यक्ष प्रकाश कंटूले, बालासाहेब हंडे, दिनेश लाहुटी,निलेश तौर, राहुल काळे, शाम राऊत, अनिल दाड,नय्युम आत्तार, विजय कंटूले, शेख आयाज, शफीक कुरेशी, पवन राठी, हमीद शेख, महेश गुजर, अनिल मुंडदा, सद्दामभाई यांची उपस्थिती होती.