राज्य उत्पादन शुल्क जालना विभागाने,अवैध हातभट्टी दारु व अवैध दारु वाहतूक विरुध्द कारवाई
जालना दि. 24- विभागीय उपआयुकत, औरगाबाद व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली दि.24 एप्रिल 2021 रोजी पाचनवडगांव, लोंढेवाडी व जालना शहरात एकूण 6 गुन्हे नोंद करण्यात आली असून त्यामध्ये पाचनवडगांव येथील कुंडलिक नदीकिनारी व लोंढेवाडी शिवाराच्या नाल्याकाठी हातभट्टी निर्मिती ठिकाणी एकूण 5 गुन्हांची नोंद करुन एकूण रु. 47,150/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व संतकृपा हॉस्पिटल, मंठा चौफुली जालना या ठिकाणी दुचाकी क्र. एम एच 21-ए सी-2913 हे बेकायदेशीर देशी दारु वाहतूक करीत असताना जप्त करण्यात आले असून जालना शहर व जिल्ह्यातील अवैध दारु विक्री, निर्मिती ठिकाणीय लक्ष ठेण्यात आले आहे. अशा विविध कार्यवाईत देशी दारुच्या 48 सीलबंद बाटल्या, गावठी हातभट्टी दारु 25 ली. रसायन 1820 लि. जप्त करुन एका दुचाकी वाहनासह एकूण रु.95,666/- रुपयांचा मुद्देमालसह जप्त करण्यात आला आहे.
या कार्यवाही मध्ये निरीक्षक एस ए शिंदे, सु अ गायकवाड, आर एन रोकडे, दुय्यम निरीक्षक ए टी बिडकर, ए ए औटे, सु अ. चव्हाण, बी एम सुर्यवंशी, बी एस पडूळ, जवान एस जी कांबळे, डि.एच सांबारे, विजेंद्र पवार, एस टी डहाळै, आर ए पल्लेवाड, ए आर बिजुले, व महिला जवान आर आर पंडित सह राज्य उत्पादन शुल्क अधिकारी, जालना उपस्थित होते.
जालना जिल्ह्यातील नागरिकांना विनंती करण्यात येते की, आपल्या गावातील परिसरातमध्ये दारु निर्मिती, वाहतूक, विक्री तसेच अवैघरित्या मळी, मद्य, मद्यार्क बाळगणे, वाहतुक करणे, किंवा विक्री करणाऱ्या इसमाची माहिती साठी संपर्क क्र. 02482-225478 व व्हाटसॲप क्र.8422001133 तसेच टोल फ्री क्रमांक 18008333333 व संपर्क साधावा असे राज्य उत्पादन शुल्क जालना यांनी कळविले आहे.