जालना जिल्हाकोरोना अपडेट
स्मशानभुमीतील पेटलेला वनवा विझता विझेना.
जालना जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संखेमुळे मृतांच्या संखेत कमालीची वाढ होत असुन, जालना शहरातील मुक्तीधाम स्मशान भूमीत रविवारी सकाळपासून तब्बल 25 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या अंत्यसंस्कारासाठी या स्मशानभूमित जागा अपुरी पडत आहे.स्मशानातील शेड अपुरे पडत असल्याने रिकम्या जागेत मृतांना अग्णीडाग दिला जात आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. अनेकांचा यात बळी जात आहे. दररोज 22 ते 25 जणांवर अंत्यसंस्कार केले जातात. असेच जर चालत राहीला तर हा वनवा कधीच विझणार नाही.जर वनवा विझवायचाच असेल तर नागरीकांनो जागे व्हा! नियमांचे पालन करा, सामाजीक दुही कायम ठेवा, सॅनीटायझरचा नियमीत वापर करा, मास्कचा वापर करा व सरावात महत्वाचे शासनाने बांधुन दिलेल्या नियमांचे पालन करा