जालना जिल्हा

भोकरदन तालुक्यातील पारध येथे पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा धरणात बुडून मृत्यू .

सोमवारी घडली दुर्दैवी घटना

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

भोकरदन तालुक्यातील पारध येथील  दोन मित्र   येथून जवळच असलेल्या पद्मावती धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. पारध बु.येथील अभिषेक प्रवीण श्रीवास्तव(वय१९)आणि महेश शंकर काटोले (वय१९)हे दोघे इतर मित्रांसोबत सोमवारी दुपारी शेजारील पद्मावती धरणावर पोहण्यासाठी गेले होते.

     सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे आणि यातील दोन्ही तरुण म्हणजे अभिषेक हा पारध येथील बसस्थानक परिसरात चहाची हॉटेल चालवत होता तर महेश हा घरची परिस्थिती हलाखीची असल्याने दुसऱ्याच्या हॉटेलवर रोजंदारीने वेटर म्हणून काम करत होता.लॉकडाउन असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत त्यामुळे हे दोघेही रिकामेच फिरत होते ते दोघे आणि इतर दोघे हे सोमवारी दुपारी गावा जवळच्याच असलेल्या पद्मावती धरणात पोहण्यासाठी गेले होते.चौघांपैकी अभिषेक आणि महेश यांनी धरणात पोहण्यासाठी उड्या टाकल्या मात्र ज्या ठीकाणी यांनी उड्या टाकल्या त्या ठिकाणी पाणी कमी पण गाळ मोठया प्रमाणात होता हे सरळ त्या गाळात फसले इतका वेळ झाला तरी दोघे वर कसे येत नाही म्हणून पोहता येत नसल्याने काठावर बसलेल्या त्यांच्या मित्र घाबरला आणि त्याने आरडाओरडा केला मात्र सध्या उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे आसपास कोणीच नव्हते त्यामुळे त्याने गावात फोन केला त्याच क्षणी गावातून सातशे ते आठशे ग्रामस्थ मिळेल त्या वाहनाने  पद्मावती धरणाकडे धावले,पोलीस आणि ग्रामस्थांनी मिळून मोठया प्रयत्नाने  त्या दोघांचे मृतदेह गाळातून बाहेर काढले. पोलीसांनी तात्काळ दोघांचेही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी प्रा.आरोग्य केंद्र पिंपळगाव रेणुकाई येथे घेऊन गेले.परंतु येथे शवविच्छदनासाठी वैध्देकीय आधिकारी हजर नसल्याने उशिरा पर्यत शवविच्छेदन झाले नाही.

    रात्री उशिरा पर्यंत पोलीस कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू होती.
गावात शोककळा
पारध येथील महेश काटोले हा लहानपणापासून होत करू व मेहनती होता.शाळेत असतानाच सकाळच्या वेळी वृत्तपत्रे वाटत होता,सहा महीन्या पुर्वी त्याच्या वडीलाचे असाह्य आजाराने निधन झाले होते.तर अभिषेक श्रीवास्तव हा आपल्या वडीलाला हाटेल मध्ये कामात मदत करत होता त्याच्या मृत्यूने गावात शोककळा पोहचली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!